परिचय

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माते प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. श्री स्वामी समर्थ व श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ब्र.प.पू.पिठले महाराज यांच्याकडून अनेक दीर्घ उपासना करवून त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थमय असे घडविले.ब्र.प.पू.पिठले महाराजांकडून एकमेव शिष्य सदगुरू प.पू.मोरेदादा यांना सर्वार्थाने परिपूर्ण असे या सेवा मार्गाच्या प्रत्यक्ष संस्थापनार्थ तयार करण्यासाठी ब्र.प.पू.पिठले महाराजांनी दीर्घ काल हिमालयात खडतर तपश्चर्या केली...

Close

गुरुप्रणाली

भगवान ब्रह्मा,विष्णू व महेश यांना धर्माचे रक्षण करण्यासाठी व आर्तपिडीत, दुःखी भक्तांचे रक्षण करण्यासाठी तपस्वी, साध्वी अनसुया व महर्षी अत्रिऋषी यांच्या घरी (अनसुयेच्या पतीसेवा बळावर) पुत्ररूपाने भगवान श्री दत्तात्रेय नावाने अवतार धारण करून यावे लागेल. परमात्मा मानवी जीवाच्या कल्याणासाठी अनादिकालापासून यापृथ्वीतलावर अवतार घेत आहे...

Close
Close

प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी

महाराजांनी इ. स. १८७८ साली अक्कलकोटला लौकिकदृष्रटया समाधी घेवून अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणेच या पृथ्वीतलावर आहेत, ही तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या २२ वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ती बरोबरच अनेक संत, सिध्द यांना धर्मकार्यासाठी विविध भागात पाठवले.

Close

गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

गुरूप्रणालीचा विचार करता आपणास लक्षात येते की, श्री स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजेच दत्त महाराजांचे कार्य दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे आजही सुरु आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लोंग श्री त्र्यंबकेश्वर (भगवान शिव, भगवान बश्च्स्नदेव आणि भगवान विष्।णू हे पार्वती मातोश्रींसहित स्थापित आहेत म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे स्थान) कुशावर्त तीर्थ, ब्रम्हगिरी पर्वत, गंगामातेचे उगमस्थान, गौतम ऋषींची शेती संशोद्यन भूमी ..

Close

आचारसंहिता

  • श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे.
  • श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.
  • सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरूका ध्यास.
  • परस्त्रियांना आपल्या माताभगिनीसमान मानावा.
  • आई, वडील, मोठाभाऊ व आचार्य यांना देवासमान मानावे, त्यांचा उपमर्द, अपमान करू नये.
  • रोज आई-वडील यांना नमस्कार करावा. त्यांचे चरणतीर्थ (उजव्या पायाचा अंगठा) घ्यावे.
  • आपल्यापेक्षा वय, विा, ज्ञान, अधिकार यात श्रेष्ठ असलेल्या व्यक्तिंच्या आसनावर बसू नये.
  • प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या घरातील देव्हार्‍यात कुलदेवता, कुलदैवत यांची स्थापना करावी व त्यांचा यथोचित मानसन्मान करावा.
  • प्रत्येक सेवेकरी जोडप्याने वर्षातून एकदातरी कुलदैवत व कुलदेवता यांचे मूळस्थानावर जाऊन त्यांचा योग्य तो मानसन्मान करावा.
Close

ग्राम विकास अभियान

भारत हा कृषी प्रधान देश असुन , भारतात ग्रामिण भागात पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. परंतु,हा ग्रामिण भारत आज आपणास समस्याग्रस्त झालेला दिसुन येतात. हि समस्याग्रस्त गावे दुरूस्त करण्यासाठी आणि उध्वस्त झालेले ग्रामजीवन सुस्थितीत आणण्यासाठी प.पू.गुरूमाऊली, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रधान केंद्र दिंडोरी, यांनी अकरा तत्वांवर आधारीत ग्रामजीवन राबविण्यास सुरवात केली ...

Close
Close

दिंडोरी प्रणित प्रकाशणे

श्री स्वामी चरित्र सारामृत

(मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती,तेलगु, व कन्नड)
shree swami charitra saramrut श्री स्वामी चरित्र सारामृत- श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपुर्ण ग्रंथ आहे. या अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भूत लीलांपैकी काही लीलांचा समावेश यात केला आहे. या ग्रंथाचे १०८ पारायणे केल्यास मनातील सर्व इच्छा पुर्ण होवून महाराजांचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथांचे एकुण २१ अध्याय असून प्रत्येक सेवेकर्‍याने दररोज नित्य सेवेत या ग्रंथांचे क्रमशः तीन अध्याय किंवा एक अध्याय तरी रोज दिवसभरातून केव्हाही वाचन करावा.


Close

आयुर्वेद

आजच्या गतिमान विज्ञान युगामध्ये मनुष्याला सकस आहार हा दुरापास्त बनलेला आहे.समतोल व सकस आहार नसल्यामुळे मनुष्याला शारिरिक व मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते म्हाणूनच हजारो वर्षापासुन भारतीय ॠषी मुनींनी,संत सज्जनांनी आयुर्वेदावर संशोधन केलेले आहेत. ॠग्वेदाचा उपवेद म्हणुन आयुर्वेदाची गणना केली जाते. आशा या आयुर्वेदातून कुठलेही दुष्परिणाम न होऊ देता व्याधींचे समुळ उच्चाटन करण्यात येते. यामध्ये चरक,सुश्रूत,वाग्भट या ॠषीमुनींचे योगदान अतुलनीय आहे.
Close
Close

भारतीय सण उत्सव

संपूर्ण भारत देशात सण, व्रत, वैकल्ये, उत्सव साजरे करण्याची अनादिकालापासूनची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीची उज्ज्वल परंपरा टिकवून ठेवणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे विविध सणांतून पितरांची सेवा, आराध्य दैवत, इष्टदैवत, ग्रामदैवत, कुलदैवत, कुलदेवता यांची विशेष सेवा करुन जीवनात सौख्य निर्माण व्हावे यासाठी कृपाशिर्वाद मिळविले जातात. कृष्ण जन्माष्टमी, श्रीपादश्रीवल्लभ जयंती, रामनवमी, गुरुद्वादशी, गणेशजयंती, हनुमानजयंती, श्रीदत्तजयंती, गुरुप्रतिपदा या उत्सवांच्या दिवशी परमेश्वराच्या त्या त्या अवतार कार्याचे स्मरण ठेवून त्यांची सेवा करुन आत्मिक व धार्मिक उन्नती साधून उत्सव साजरे केले जातात...

दिंडोरी प्रणित उत्सव

श्री स्वामी समर्थ जयंती (चैत्र शुक्ल २) या दिवशी भगवान श्री गुरुदत्तात्रेयांचा आगळावेगळा आविष्कार आग्य्राजवळील छेले या गावी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरुपात भूतलावर अवतरला आणि आपल्या सर्वांचे महद्भाग्याने आजही हा आविष्कार अविरतपणे कार्यरत आहे. याची जाणीव आपल्या प्रत्येक सेवेकर्‍याला होण्याकरीता हा उत्सव आपल्या सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर करावयाचा आहे. या दिवशी आपल्याला शिकविण्यात आलेल्या सर्व सेवांची उजळणी व नवीन सेवेकर्‍यांना आपल्या मार्गातील साधनेचे मंत्र, प्रयोग, उतारे, तोडगे यांचे प्रात्यक्षिक दाखविण्याकरीता आपल्या केंद्रात मांदियाळी (श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे मागील पानावर दिलेल्या पद्धतीनुसार) करावी.
Close
Close

देणगी व अन्नदान