Main Category

आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते नेपाळ देशात बालसंस्कार केंद्र स्थापन झाले.

देश-विदेश अभियान विभाग आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते काल नेपाळ देशात बालसंस्कार केंद्र स्थापन झाले… तारा सदन इंग्लिश स्कूल चाबेल, काठमांडू, नेपाळ या देशात काल बालसंस्कार केंद्र स्थापन झाले. शाळेतील सर्व शिक्षक बालसंस्कार पाठयक्रम नुसार वर्ग घेणार आहेत. स्वामींचा फोटो ही कायम शाळेत ठेवणार आहेत.      

आणखी वाचा

प्रचंड प्रतिसादात, उदंड उत्साहात युवा महोत्सव संपन्न

आज दि. २९ एप्रिल २०१८, रविवार रोजी युवा प्रबोधन विभागातर्फे भव्य युवा महोत्सवाचे आयोजन संपन्न झाले. गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या युवा महोत्सवात शिक्षण, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, अध्यात्म, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातील मान्यवर, राज्यातील काना-कोपऱ्यातून आलेले सुमारे दोन हजार युवक – युवती सहभागी झाले होते. …

आणखी वाचा

मोठ्या दिमाखात 7व्या जागतिक कृषी महोत्सवाचे उदघाटन सोहळा संपन्न

कृषी दिंडी, माती व धान्य पूजन, शेतकरी सन्मान सोहळा, कृषी माऊली पुरस्कार, नैसर्गिक शेती चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन झाले

आणखी वाचा

शेतकरी वधु वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

विवाह संस्कार  विभाग अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित द्वारा जागतिक कृषि महोत्सव २०१८ शेतकरी वधु वर परिचय मेळावा डोंगरे वसतिगृह नाशिक कार्यक्रमाला उत्सपुरथ प्रतिसाद.. प.पु. गरूमाऊलींच्या उपस्थित नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू यांची विवाह संस्कार विभागाला भेट.    

आणखी वाचा

जागतिक कृषी महोत्सव२०१८: सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी

सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी स्थळ: डोंगरे वसतीगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक | दिनांक: २९ एप्रिल, २०१८ | वेळ:दु.२   मान्यवर / महोदय… स.नमस्कार श्री स्वामी समर्थ कृषी शास्त्र विभाग दिंडोरी जि.नाशिकच्या वतीने गेल्या ७ वर्षा पासून नाशिक येथे कृषी महोत्सव आयोजित केला जातो.कृषी महोत्सवाची प्रेरणा श्री स्वामी समर्थ सेवा व …

आणखी वाचा

श्री हनुमान जयंती (चैत्र शु.१५) (दि.३१ मार्च २०१८)

या दिवशी आपल्या केंद्रात सूर्योदयाच्या वेळी महावीर हनुंताचा जन्मोत्सव साजरा करावा. तसेच, मारुती स्तोत्र (११ वेळा) पंचमुखी हनुमान स्तोत्र (१ वेळा)  वडवानल स्तोत्र (१ वेळा)  रामरक्षा वाचावी (१ वेळा) यादिवशी प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या परिसरातील हनुंताच्या मंदिरात जाऊनत्यांचे दर्शन घ्यावे व त्यांना गूळ, फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. हनुमान हे बल, बुद्धी, शक्ती, …

आणखी वाचा

अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३) (१८ एप्रिल २०१८)

हा दिवस चार प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी १२ वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून, हात जोडून पितृस्तुती म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन करतांना खाली गहू ठेवणे. …

आणखी वाचा

तेजोनिधी सद्गुरु प.पू. मोरेदादा पुण्यतिथी (वैशाख शु.१२) (२६ एप्रिल २०१८)

जनसामान्यांना, सेवेकरी, कुटुंबियांना उत्कर्षाकडे, समृध्दीकडे, मोक्षाकडे नेणारे पुण्यपुरुष, प्रचंडसामर्थ्यवान, अपरंपार कर्तृत्वाचे आदर्श असे शिवतेज. श्री स्वामी समर्थांचेच तेजोवलय स्वरुप अर्थात सद्गुरु प.पू.मोरेदादा! ‘भक्त  जन हृदयनिवासा श्री सद्गुरु प.पू. मोरेदादा’ स्वत:कडे कुणाचेही गुरुपद न घेता श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपदी मानायला शिकविले नव्हे तसा संस्कारच सेवेकरी बालकांवर केला. आपल्या यशस्वी कृतीतूनच …

आणखी वाचा