सण-वार / वृत्त / उत्सव

हरतालिका (भाद्रपद शु. ३) (दि.१२ सप्टेंबर)

  श्रावणापासून सणांना जी सुरूवात होतेती असते दिवाळीपर्यंत. दिवाळीनंतर असणारा ऋतू इतका सुंदर व आल्हाददायक असतो की, वसंतऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सणही एक पर्वणीच असते. भाद्रपद महिन्यात येणारे ‘हरतालिका व्रत’ हे वर्षाऋतूत येते. वटसावित्री, मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते. त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे. …

आणखी वाचा

श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शु. ४) दि. १३ सप्टेंबर

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘महासिध्दी विनायकी’ चतुर्थी म्हणतात. हा श्री गणेशाचा उत्सव भाद्रपद शु.४ ते भाद्रपद शु. १० (अनंत चतुर्दशी) पर्यंत १० दिवस असतो या चतुर्थीच्या दिवशी ‘सुखकर्ता दुखहर्ता’ अशा गजाननाचे आगमन होते. भाद्रपदात येती गौरी गणपती। उत्सवा येई बहर ॥ असा बहर सर्वत्र दिसतो. गणेश चतुर्थीला गणपती घरोघरी बसविले जातात. …

आणखी वाचा

श्रीपाद श्रीवल्लभ जयंती (भाद्रपद शु.४) (दि.१३ सप्टेंबर) (दिंडोरी प्रणीत उत्सव)

भाद्रपद शुध्दचतुर्थी अथवा गणेश चतुर्थी याच दिवशी हा कार्यक्रम असतो. आपल्या सर्व केंद्रात जी सेवा पध्दत आहे ते नित्य नियम, आरत्या वगैरे सर्वांचे मूळ श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीमहाराज आहेत. ही वाटचाल ज्या सद्गुरू प. पू. पिठले महाराजांनी सुरू केली त्यांचे सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभ होते. या दिवशी सकाळची आरती झाल्यावर पुढील प्रमाणे …

आणखी वाचा

ऋषीपंचमी व्रत (भाद्रपद शु. ५) (दि.१४ सप्टेंबर)

भाद्रपद शुक्ल पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. ज्यांनी परमेश्‍वराच्या श्‍वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रकटीकरण केले, जतन केले, त्याचा गूढार्थ सामान्य जनांपर्यंत पोहोचविण्याचे महत्कार्य केले त्या ऋषिमुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपवास केला जातो. त्यांचे अंशत: अनुकरण करण्याच्या हेतूने या व्रतादिवशी विविध कंदमुळे, …

आणखी वाचा

अनंत चतुर्दशी दिंडोरी प्रणीत उत्सव (भाद्रपद शु.१४) दि. २३ सप्टेंबर

बर्‍याच ठिकाणी या दिवशी ‘गणपती विसर्जन’ हा उत्सव साजरा केला जातो. दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह, योग्य उत्तरपूजा करून विधिवत सागर, नदी, सरोवर वा शेतजमीन यात विसर्जित केले जाते. ‘पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा, आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा’ अशी प्रार्थना …

आणखी वाचा

भाद्रपद वद्य पंधरवडा: महालय (भाद्रपद कृ. प्रतिपदा ते अमावस्या) दि.२५ सप्टें-९ ऑक्टो

या काळाला पितृपक्ष म्हणतात. या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान त्यांच्या नावाने करावे. सद्गृहस्थास जेवू घालावे. पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त पठण व हवन करावे. नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले तरी चालते. तसेच या दिवशी व प्रत्येक अमावास्येला दुपारी …

आणखी वाचा

श्रावण (श्रावण शु.1) (दि.12 ऑगस्ट 2018)

आषाढ शु. एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत, आषाढ पौर्णिेपासून कार्तिक पौर्णिेपर्यंत होणार्‍या चार महिन्यांच्या काळासn ‘चार्तुास’ असे म्हणतात. मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. ‘दक्षिणायण’ ही देवांची रात्र असून ‘उत्तरायण’ हा त्यांचा दिवस असतो. आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ असे म्हणतात. कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना …

आणखी वाचा

स्वातंत्र्य दिन (राष्ट्रीय सण) श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी येथे संपन्न

भारतीय स्वातंत्र्याचा मंगलमय दिवस म्हणून १५ ऑगस्ट साजरा केला जातो. भारतमातेची सेवा म्हणून सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दुर्गा सप्तशतीचे सामुदायिक पठण होते. रक्तदान, श्रमदान, ज्ञानदानाचेही कार्यक्रम सर्व केंद्रात सामूहिक स्वरूपात घेतले जातात. यादिवशी श्री गुरुपीठातहीध्वजारोहण सोहळा साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी दरबार येथे प.पू. गुरुमाऊली …

आणखी वाचा

चातुर्मास्य व्रते

* चातुर्मास्य व्रते * अश्‍वत्थ म्हणजे पिंपळ आणि तुळस यांची पूजा, सेवा, प्रदक्षिणा, दीपदान, भगवान विष्णूंच्या स्तोत्रांचे, मंत्रांचे पठण, विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, सुलभ भागवत्, विष्णू पुराण श्रवण, पठण करावे. * शयनव्रत * शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित ४ भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणाची पूजा, दिवसभर मौन, चंद्रोदयानंतर अर्घ्य …

आणखी वाचा

देवशयनी एकादशी (आषाढ शु.११) (दि. 23 जुलै 2018)

या दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो. भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर ४ महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी सर्व सेवेकर्‍यांनी उपवास करावा व आपल्याला सद्गुरू प.पू. मोरेदादांनी दिलेला भगवान श्री पांडूरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा. या दिवसापासून ४ महिने गोपद्मव्रत करावे. आपल्या देवघरासमोर रोज …

आणखी वाचा