प.पू.गुरुमाऊली यांच्या हितगुजातील अमृतकण

* श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही भूमीच ऋषी मुनींची पुण्य भूमी आहे.
* भगवान शिव तथा भगवान श्रीदत्तात्रे यांच्या पुण्य भूमीमध्ये येणारे महत भाग्यवान असतात.
* गंगा अवतरणाच्या यामहान भूमीमध्ये पूर्वापार अनेक संत- माहात्मे वास्तव्यास होती, ती आज तागायत प्राणवायू स्वरूपात आहेत.
* एकदिवसीय नवनाथ पारायण सेवेक-यांद्वारे संपन्न होताच पाऊस न पडणा-या भागामध्येही पावसाने जीवदान दिले. एकदिवसीय उपक्रमांचा फार मोठा चांगला परिणाम होत असतो.
* देश सेवेची कळकळ केवळ सेवेकरी परीवारास असते.
* सेवेकरी हा स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे लढवय्या असावा, राष्ट्रभक्तीचा ऊर्जा स्त्रोत आई भगवतीच आपल्याला पुरविणार आहेत.
* भारतीय सैन्याचे हातबळकट करण्यासाठी, त्यांना ऊर्जा पोहोचविण्यासाठी सेवेकरी लोकांनी केलेली सेवा पुरेशी ठरेल.
* अध्यात्मातून राष्ट्रभक्ती कडे वाटचाल करावी.
* शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजीनिअर व शेतकरी हे पाच घटक सुव्यस्थित घडविल्यास या देशात रामराज्य येईल.
अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक सप्टेंबर २०१७ संपर्क.(०२५५७)२२१७१०