स्वतंत्रता दिनी आ. नितीन भाऊ यांच्या हस्ते आधार आश्रमात ध्वजारोहण व वह्या वाटप कार्यक्रम

आ. नितीन भाऊ यांनी १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिनी आधार आश्रमाची भेट घेतली व सर्व मुलांना वह्या वाटप केल्या गेल्या.

स्वातंत्र्यदिनानिमित्त धजारोहण व आधारतीर्थ आधार आश्रमातील मुलांना वह्या वाटप.
७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ आणि
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर यांच्या वतीने आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे आधार आश्रम, त्रंबकेश्वर येथे विद्यार्थ्यांना संस्कार वह्यांचे व बालसंस्कार पाठयक्रम ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
# अनेक उत्तुंग कलाकृतींचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
# आपल्या मनोगतात श्री नितीनभाऊ म्हणाले :आधारतीर्थातील मुलांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात श्री गुरुपीठ नेहमीच तत्पर राहील
# या कार्यक्रमात मेजर समीर खान, निवृत्त कर्नल, निवृत्त आय.पी. एस अधिकारी उपस्थित होते.