पुणे जिल्ह्यात आ.आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत मार्गदर्शन व चर्चासत्र हितगुजामधील अमृतकण

 • अन्नावर आज सर्वात वाईट संस्कार होत आहेत.
 • आरोग्य हे सर्वात महत्वाचे धन आहे.
 • आज समाजाने धन आणि लक्ष्मी याची व्याख्याच बदलली आहे.
 • लक्ष्मी म्हंटले की सर्वांचे लक्ष्य लक्ष्मीमातेकडे न जाता तिच्या हातातील सोन्याच्या कुंभाकडे जाते.
 • खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे दोन रूप आहे: १) पहिला घरात जन्माला येणारी मुलगी. २) दूसरे रूप म्हणजे घरात येणारी सून.
 • सेवेकऱ्यांचे आरोग्य स्वस्थ राहावे म्हणून आपण देशी बियान्यांची *’शाकंभरी बीज बैंक’*सुरु केली आहे.
 • परान्नाने जर घडलेला माणूस बिघडू शकतो तर सात्विक अन्नाने बिघडलेला माणूस घडू शकतो.
 • सेंद्रिय शेतीचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो तर सात्विक अन्न – धान्याने मनावर व आरोग्यावरही चांगले परिणाम होतात.
 • स्वयंरोजगार विभागाद्वारे आपल्याला जगभर सात्विक अन्न पोहोचवायचे आहे.
 • आपल्या सेवेकऱ्यांना अर्थार्जनासाठी कोणापुढे हात पसरवायाची गरज पडु नये म्हणून स्वयंरोजगार विभाग आहे.
 • प्रत्येक केंद्रात विभागांचे किमान दोन प्रतिनिधी कार्यरत असावे.
 • व्यक्तीपरत्वे कार्य न करता विभागपरत्वे कार्य व्हावे !.
 • पार्वती मातेने त्यांच्या अंगाच्या मळाने गणेशाची मूर्ती केली होती, मळ म्हणजे माती! म्हणून मातीपासून केलेले गणपती बसवा!!.
 • पार्वती मातेने बाळ म्हणून गणेशाची मूर्ती बनवली, बाळाची ती मूर्ती किती मोठी असेल? आणि समाजात मंडळ आज किती मोठ्या मूर्ती बसवतात?.
 • पूर्वी पर्यावरण विभाग नव्हता असे काही विद्वान विचारतात पण प्रदुषण देखील इतकं होतं का?.
 • पूर्वी जितकं सत्व अन्नात असायचं त्याच्या पन्नास टक्के देखील सत्व आजच्या अन्नात नाही.
 • चांगली पॅकिंग केलेले पदार्थ खरच सात्विक आणि शुध्द असतात का? त्यापेक्षा मंत्र जप करत बनवालेले सात्विक अन्न कृषी धनामार्फत सर्वांना उपलब्ध करून देत आहे.
 • लोकांची मागणी खुप आहे, आपले प्रतिनिधी कमी पडत आहे.
 • कृत्रीम तलावांची पण गरज पडु नये म्हणून माती, पंचगव्य, झाडाचे बीज असलेले गणपती आपण बनवले आणि त्याचं विसर्जन कुंडीत केले.
 • बालसंस्कार वर्गातील मुले 120 वर्षे जगले पाहिजे, आरोग्यदायी हवे, त्यांचे विचार अगदी उच्च असावे जसे चिखलात कमळ! यासाठी प्रयत्न करुया!!.
 • फ़क्त व्यसन केल्यानेच कॅन्सर होत नाही तर केमिकलयुक्त अन्नाने कॅन्सर होत आहे.
 • सामूहिक उपक्रमात व्यक्ति पुढे न दिसता विभाग पुढे आलेले दिसले पाहिजे.
 • स्वयंरोजगार विभागामार्फत स्थानिक गरजा पूर्ण व्हाव्यात.
 • आज समस्या खुप वाढल्या आहे आणि समस्यांचे स्वरूपही खुप बदलत आहे, त्यामुळे फ़क्त तोडगे-उपायांपुरते मार्गदर्शन मर्यादित न ठेवता विभागांना पुढे आणा.
 • आज प्रापंचिक समस्या खुप वाढल्या आहेत, त्यामुळे विवाह संस्कार विभाग महत्वाचा आहे.
 • शास्त्रांपेक्षा संस्कार महत्वाचे आहे.
 • बाहेर पैसे देऊन सुध्दा ज्या सर्विसेस/सेवा मिळत नाही ते आपण केंद्रातुन नि:शुल्क देतो.
 • श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक समाजाला सांगायची वेळ आली आहे.
 • आपल्यात जादू नाही तर ज्ञानात जादूची ताकद आहे आणि स्वामी महाराज यांच्याच आधीन  सर्व ज्ञान आहे.
 • केंद्रात फ़क्त आपला स्टॉल असणे म्हणजे स्वयंरोजगार विभाग नव्हे, तर केंद्रात कोणीही बेरोजगार राहु नये म्हणजे खऱ्या अर्थाने स्वयंरोजगार विभाग कार्य.
 • सद्गुरु मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊलींना अपेक्षित कार्य करणारे केंद्र असावे, केवळ तोडगे – उपाय सांगणारे नसावे!.