तंजावुर-तमिळनाडू येथे प्रथमच दिंडोरी प्रणीत सत्संग कार्यक्रम

तंजावुर-तमिळनाडू येथे प्रथमच दिंडोरी प्रणीत सत्संग कार्यक्रम
१) तंजावुर येथील तामिळ नागरीकांनी आदरणीय श्री. नितिनभाऊंचे भव्य स्वागत केले.
२) तंजावुर येथील तामिळ सेवेकऱ्यांच्या विनंतीनुसार कार्यक्रम इंग्रजी व तामिळ भाषेत आयोजित करण्यात आला.
३) आदरणीय श्री. नितिनभाऊंचे इंग्रजीतील हितगुज येथील स्थानिक सेवेकऱ्याने तामिळमध्ये भाषांतरित केले.
४) देश विदेश अभियानाअंतर्गत प्रथमच तामिळ भाषेत आगळावेगळा उपक्रम.
५) आदरणीय श्री. नितिनभाऊंनी हितगुज तामिळ भाषेत सुरु केले व हितगुजात विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तंजावुरची परंपरा व इतिहास, सेवा मार्गाची पार्श्वभूमी, पितृदोष लक्षणे व उपाय, महिला सक्षमीकरण, ११ अलंकारांची शास्त्रीय माहिती, स्तोत्र-मंत्र, बालसंस्काराचे महत्व, वास्तुशास्त्र, पिरॅमिड, देवघर देव्हारा, आरोग्यशास्त्र इ.
६) युनेस्को जागतिक वास्तू म्हणून प्रसिद्ध असलेले बृहदेश्वर महादेव मंदिर संस्थेतर्फे सेवा मार्गाचा सन्मान व आदरणीय श्री. नितिनभाऊंची सदिच्छा भेट.
७) शहाजी राजांच्या वंशजांच्या महालात आदरणीय श्री. नितीनभाऊंचे भव्य स्वागत.
८) आशिया खंडातील सर्वात मोठे व पुरातन ग्रंथालयाने आदरणीय श्री. नितीनभाऊंचा सन्मान केला.
९) थामराई इंटरनेशनल स्कूलचे प्रिंसिपल श्री. गणेश सर यांनी तंजावुर येथे बालसंस्कार सुरु करण्यासाठी आदरणीय श्री. नितिनभाऊंचे मार्गदर्शन घेतले.
सबसे बडा गुरू, गुरू से बडा गुरू का ध्यास
कार्यक्रमातील काही क्षण चित्रे