श्री गुरू द्वादशी (दिंडोरीप्रणीतउत्सव) (आश्विनकृ.12) दि.16 ऑक्टोबर 2017

गुरु द्वादशी म्हणजे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या निजधामगमनाचा, नवा अवतार धारण करण्याचा दिवस आहे.
या दिवशी सकाळी 8.00 चे आरती पूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज व दत्तमहाराजांच्या फोटोच्या मध्यभागी ठेवावा. आरती झाल्यावर प्रत्येकाने 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर श्री गुरूचरित्र ग्रंथाचा 9 वा अध्याय एका सेवेकर्याने मोठ्याने वाचावा, इतरांनी त्याचे श्रवण करावे. 10.30 च्या आरतीला अन्नाचे 6 नैवेद्य करावे. श्रीपाद श्रीवल्लभांचे आवडीचे पदार्थ नैवेद्यात करावेत.
(अधिक माहितीसाठी ज्ञानदानभाग 1 बघणे.)

Check Also

दिवाळी ऑक्टोबर 2017

  धनत्रयोदशी (आश्विनकृ.13) दि.17 ऑक्टोबर 2017 या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता …