दिवाळी ऑक्टोबर 2017

 

धनत्रयोदशी (आश्विनकृ.13) दि.17 ऑक्टोबर 2017

या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा 1 माळ जप करावा.
फुलांचा हार घालावा, तुळसवहावी, नैवेद्यदाखवावा. धन्वंतरीच्या उपासने बरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे व दीर्घायुष्य व आरोग्ययासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. 1 वेळा विष्णूसहस्त्रनाम, रामरक्षा, गीतेचा 15 वा अध्याय, 1 वेळा कालभैरवाष्टक, 1 माळ महामृत्यूंजयमंत्र.
यम दीपदान :या दिवशी सायंकाळी कणकेचा एक मोठा दिवा किंवा मातीची पणती घ्यावी. त्यात तेल व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला (दिव्याची ज्योत दक्षिणेला करावी) पेटवून ठेवावा व दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यमराजाचा मंत्र म्हणावा व त्याला नमस्कार करावा.
मृत्युनांदण्डपाशाभ्यांकालेनशामयासहा।त्रयोदशांदीपदानात्सूर्यज: प्रीयतांमम॥

नरकचतुर्दशी (आश्विनकृ.14) दि. 18 ऑक्टोबर 2017

जगातील पहिला सामुदायिक स्त्री मुक्ती दिन. नरकासुराने पळवून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्री कृष्णाने मुक्त केले व त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले व स्वत:चे म्हणून सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले. यातून जगातील तमाम मानवास आदर्श घालून दिला आहे की, आपल्या देशात स्त्री भ्रष्टहोते म्हणजे देश भ्रष्ट होतो, असे समजले जाते.
व्यासांनी,पूर्वजांनी या स्मृती प्रित्यर्थ हा दिवाळीचा सण सुरू केला. उत्सव म्हणून पहाटे उठून स्नान करायचे असते.
या दिवशी सर्व सेवेकरी भगिनींनी श्री कृष्णाच्या फोटोस पूजा करून हार घालावा. नैवेद्य दाखवावा व कृतज्ञता पूर्वक त्या भगवानाच्या अगाधलीलांचे कार्य कारण भावात्मक चिंतन, मनन करावे. विष्णूसहस्त्रनाम, गीतेचा 15 वा अध्याय अथवा संपूर्ण गीता पठण करावी, गीतेची 18 नांवेम्हणावी, 1 वेळा लक्ष्मीनृसिंहस्तोत्र वाचावे. व्यंकटेशस्तोत्र म्हणावे.

लक्ष्मीपूजन-लक्ष्मी-कुबेरपूजन (आश्विनकृ.30) दि.19 ऑक्टोबर 2017

* कार्यकारणभाव : बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका, लक्ष्मी कारक व्रतां पैकीएक.
* पूजासाहित्य : गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले (शक्यतो पांढरी रुई, पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरी कन्हेर, झेंडूइ.) तुळशीपत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचातांब्या, फळे, नैवेद्यास, पुरणपोळी, साळीच्यालाह्या, बत्ताशे, फराळाचे पदार्थ इ. (ग्रंथ-नित्यसेवा, श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक)
* पूजामांडणीवपूर्वतयारी *
पूजेची वेळ सायंकाळी 5.30 नंतर
सोबत दिलेल्या चित्रानुसार प्रदोष काळापूर्वीच मांडणी करावी. (सायं. 5.30 वा.)
1) देव्हार्या समोर एक मोठा पाट ठेवावा व त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंथरावे.
2) चित्रात दिल्यानुसार पाटावर स्वस्तिक काढावे (त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली नवीन केरसुणी ठेवण्यात येईल.) पाटावर डाव्याबाजुला लक्ष्मीनारायणयांची प्रतिमा ठेवावी, त्याच्या समोर दोन स्वतंत्र जोड पानांवर कोजागरी पौर्णिमेस वापरलेल्या देवीलक्ष्मी आणि कुबेरयांच्या सुपार्या ठेवाव्यात. त्यानंतर दोन सुक्या खोबर्याच्या वाट्यांमध्ये अनुक्रमे खडीसाखर व बत्ताशे-साळीच्यालाह्या भराव्यात. त्यानंतर या दोन्ही वाट्या जोडपानावरील सुपारी स्वरुपातील देवतांच्या समोर ठेवाव्यात.
3) लक्ष्मीनारायणयांच्या प्रतिमे शेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा.
4) त्याच्या समोरील बाजुस चारहत्तींनीयुक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे, त्यासमोर एक नारळ ठेवावे. पैसे, सोने, चांदी, फळे, फराळाचे पदार्थ इ. चित्रात दर्शविल्या प्रमाणे त्यात्या ठिकाणी ठेवावे. पूजेच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी, अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावना जवळ रांगोळी काढावी. तुळशी पासून पूजेच्या ठिकाणा पर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावले काढावीत.
5) तद्नंतर देवघर, प्रवेशद्वार, तसेच तुळशी जवळ पणत्या प्रज्वलित कराव्यात.
6) पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूपलावावा, सर्वत्र गोमुत्र शिंपडावे. घरातील वातावरण शांत ठेवावे. टी.व्ही. टेप बंद ठेवावेत.

* पूजनविधी *
सायंकाळी 5:30 वा. पूजेस सुरुवात करावी. पूजेची सुरुवात तुलसी पूजनाने करावी.
1) तुलसीपूजन – प्रथम तुळशी जवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून, हळद-कुंकू, अक्षता व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी. (पंचोपचारपूजा – गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले, धुप, दीप व खडीसाखरेचा नैवेद्य) यानंतर एक वेळा तुलसी स्तोत्र किंवा तुलसीमंत्र अकरावेळा म्हणावा.

* तुलसीस्तोत्र *
‘तुलसीसर्वव्रतानांमहापातकनाशिनी।
अपवर्गप्रदेदेवीवैष्णवानांप्रियसदा।
सत्येसत्यवतीचैवत्रेतायामानवीतथा।
द्वापारेचावतीर्णासीवृन्दात्वंतुलसीकली:॥’
तुलसीमंत्र- “ॐर्हींक्लींऐंवृन्दावन्यैस्वाहा॥”
2) तसेच पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुणीची पंचोपचार पूजा करावी.
3) तद्पश्चात प्रवेश द्वारा जवळयावे, प्रवेशद्वाराची हळद-कुंकू वाहून पूजा करावी.
4) त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यावे, बाहेरून पूजा करून आणलेली केरसुणी चित्रात दाखविलेल्या जागी ठेवावी. त्यानंतर निम्नलिखित क्रमानुसार पूजा करावी.
* सर्व प्रथम देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून श्री स्वामीस्तवन म्हणावे तसेच 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा.
* त्यानंतर महिलांनी स्वत:च्या कपाळाला हळद-कुंकू तर पुरुषांनी अष्टगंध लावावा.
* आचमन :भगवानविष्णूंच्या 24 नावां पैकी प्रथम तीन नावांनी पाणी प्राशन करावे व पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे नंतर हातजोडून पुढील नावे म्हणावीत.
1) ॐकेशवायनम: 2) ॐनारायणायनम: 3) ॐमाधवायनम: 4) ॐगोविंदायनम: 5) ॐविष्णवेनम: 6) ॐमधुसुदनायनम: 7) ॐत्रिविक्रमायनम: 8) ॐवामनायनम: 9) ॐश्रीधरायनम: 10) ॐऋषिकेशायनम: 11) ॐपद्मनाभायनम: 12) ॐदामोदरायनम: 13) ॐसंकर्षणायनम: 14) ॐवामनायनम: 15) ॐप्रद्युम्नायनम: 16) ॐअनिरुद्धायनम: 17) ॐपुरुषोत्तमायनम: 18) ॐअधोक्षजायनम: 19) ॐनारसिंहायनम: 20) ॐअच्युतायनम: 21) ॐजनार्दनायनम: 22) ॐउपेंद्रायनम: 23) ॐहरयेनम: 24) ॐश्रीकृष्णपरमात्मनेनम:
* प्राणायाम *
प्राणायाम करण्यापूर्वी पुढील विनियोग म्हणावा.
‘प्रणवस्यपरब्रह्मऋषि।परमात्मादेवता।देवीगायत्रीछंद:।प्राणायामेविनियोग:॥’
नंतर खाली दिलेली कृती करावी :
प्रथम मधल्या दोन बोटांनी डावी नाक पुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास आतघ्यावा व नंतर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी व मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणावा.
ॐभू: ॐभुव: ॐस्व: ॐमहा: ॐजन: ॐतप: ॐसत्यंॐतत्सवितुर्वरेण्यमभर्गोदेवस्यधीमहि।धियोयोन: प्रचोदयात्॥
नंतर डाव्या नाकपुडी वरील बोटकाढून श्वासबाहेर सोडावा व उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून घ्यावा, या क्रियेला प्राणायाम म्हणतात.
नंतर उजव्या हाताने दोन्ही कानास (प्रथम उजवा) व तोंडास पाचही बोटांनी स्पर्श करावा, व पुढील मंत्र म्हणावा:
‘ॐआपोज्योतीरसोमृतंब्रम्हभूभुर्वव: स्वरोम्॥’
* त्यानंतर हातात पाणी घेऊन निम्नलिखित संकल्प म्हणावा :
संकल्प : ‘मी (अमुक) गोत्रातउत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा/महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्य्र निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्ती साठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरू, आई-वडीलयांची भक्ती, सेवा व सान्निध्यप्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरात, कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथा शक्ती, यथा ज्ञानेन दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे.’
* त्यानंतर श्रीगणेश ध्यानमंत्र म्हणावा :
‘वक्रतुंडमहाकायसूर्यकोटीसमप्रभ:।निर्विघ्नंकुरूमेदेवसर्वकार्येषुसर्वदा॥’
त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने देव्हार्यातील श्री गणेशमूर्तीवर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेककरावा व नंतर पूजेच्या कलशात गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुलेवाहून गंगादीसप्त नद्यांचे स्मरण करत नमस्कार करावा.
‘ॐपुण्डरीकाक्षायनम:।’म्हणतपूजेच्यातांब्यातीलपाणीसर्वपूजासाहित्यवस्वत: वरशिंपडावे.
* त्यानंतर फक्त कुलदेवतेच्या टाकावर 16 अथवा 1 वेळा श्री सूक्तम्हणून अभिषेक करावा (टाक ताम्हणात घ्यावा) व नंतर पुसून जागेवर ठेवून गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले वाहून पूजन करावे.
* त्यानंतर श्री लक्ष्मी ध्यान मंत्र म्हणावा :
श्रीलक्ष्मीध्यानमंत्र – ‘ॐकान्त्याकांचनसंन्निभांहिमगिरीप्रख्यैश्चतुभिर्गर्जे।हस्तोत्क्षिप्तहिरण्मयअमृतघटैरासिंचमानाश्रियम्॥
विभ्राणांवरमब्जयुग्मभयंहस्तै; किरीटोज्ज्वलां।क्षौमाबद्धनितम्बबिम्ब ललितांवंदेऽरविन्द्रस्थिताम्॥’
* त्यानंतर पूजा मांडणीतील सर्व देवतांचे गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले, तुळशीपत्र वाहून पूजन करावे, धूपदीप ओवाळावा व पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लाह्या-बत्ताशे, फराळाचे पदार्थ, फळे इ. चा नैवेद्य दाखवावा.

* त्यानंतर मातालक्ष्मीची प्रार्थना म्हणावी.
श्रीलक्ष्मीप्रार्थना :
‘त्रैलोक्यपूजितेदेवीकमलेविष्णूवल्लभे।
यथात्वमचलाकृष्णेतथाभवमयिस्थिरा॥
कमलाचंचलालक्ष्मीश्चलाभुतिर्हरिप्रिया।
पद्मापद्मालयासम्यगुच्चै: श्रीपद्मधारिणी॥
धनदायैनमस्तुभ्यंनिधीपद्मधिपायच।भूवन्तूत्वत्प्रसादान्मेधनधान्यादिसंपदा॥’
* त्यानंतर एकवेळा तंत्रोक्तदेवीसुक्त वाचावे व सप्तशतीग्रंथातील क्षमाप्रार्थना म्हणावी.
* त्यानंतर सेवा केंद्रातील क्रमानुसार सायंकाळची आरती करावी. श्री गणपतीच्या आरती नंतर देवीची आरती म्हणावी. पूजेच्या समाप्तीनंतर अभिषेकाचे तीर्थ सर्व घरात शिंपडावे.
* हे लक्ष्मीकारक व्रत असल्यामुळे कुटुंबातील सर्वसदस्यांनी सामूहिक पद्धतीने खालील विशेष सेवा रुजू करावी :
* एक माळ श्री ऋणनाशकगणेश मंत्र * एक माळ श्री लक्ष्मीगायत्री मंत्र * एक माळ कमलात्मक मंत्र * एक माळ ‘श्रीं’मंत्र * एक माळ षोडशी मंत्र * एक माळ श्री विष्णूगायत्री मंत्र * एक माळ श्री विष्णूंचा मंत्र * एक माळ श्री कुबेर मंत्र * एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र * एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय, गीतेची अठरा नावे * एक वेळा व्यंकटेशस्तोत्र * एक वेळा विष्णूसहस्रनामस्तोत्र * एक वेळा श्रीरामरक्षा

*अलक्ष्मीनिस्सारण*

या दिवशी घराची सर्व दारे, खिडक्या रात्री 12 वाजे पर्यंत उघड्या ठेवाव्यात तसेच सर्व दिवे सुरूठेवावेत. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंती पासून एकासरळ रेषेत केरसुणीन उचलता झाडत आणावे. केरसुणी उंबरठ्यावर आपटावी व तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असतांना ‘अलक्ष्मीनि:सारण’म्हणावे.
या नंतर जर कधी घरात मतभेद, कटकट झाली किंवा बाधितव्यक्तीघरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरीलप्रमाणे कृती करावी. यामुळे घरात आनंद, सुख समाधानतसेच लक्ष्मीस्थिर होण्यास मदत मिळते. यादिपावली पर्व काळात अन्नदानादीदान धर्म करावा.
श्री माता लक्ष्मींनाशांतता अधिक प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कशवाद्ये, फटाके वाजविणेटाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाहीत.

Check Also

श्री गुरू द्वादशी (दिंडोरीप्रणीतउत्सव) (आश्विनकृ.12) दि.16 ऑक्टोबर 2017

गुरु द्वादशी म्हणजे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या निजधामगमनाचा, नवा अवतार धारण करण्याचा दिवस आहे. या दिवशी सकाळी 8.00 चे आरती पूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज व दत्तमहाराजांच्या फोटोच्या मध्यभागी ठेवावा. आरती झाल्यावर प्रत्येकाने 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा.