देश विदेशात भव्य एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबिर संपन्न

दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख प.पु. गूरूमाऊलींच्या आशिर्वादाने तसेच गुरूपुत्र आ.नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी देश विदेशात कार्यरत बालसंस्कार केंद्रातर्फे सुमारे 350 ठिकाणी एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.

आजचा बालक उद्याचा युवक असून समाजाचे भविष्य आहे, राष्ट्र संपत्ती आहे. आजच्या दूषित वातावरणात दिशाहीन झालेल्या नव्या पिढीला चारित्र्यवान व नीतिवान बनवायचे असेल तरबालसंस्कार ही काळाची गरज आहे. आज समाज पतनाच्या मुख्य कारणात संस्काराचा अभाव हे मुख्य कारण आहे, या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते.

संस्कार हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे, कुठल्याही स्थावर रचनेची मांडणी आधी पाया मग कळस असते. येणे प्रमाणे पाया मजबूत व टिकाऊ असला तर कळस दिमाखदारपणे झळकतो.

ओल्या मातीस हवा तसा आकार देवून त्यावर सुंदर नक्षीकाम केल्याने उत्कृष्ट शिल्प बनते व जग मान्यता पावते

*श्री स्वामी समर्थ मार्गाच्या कार्याद्वारे नवीन पिढीला नीतीमूल्य शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार व चरित्र संवर्धन करणे हा प्रमुख उद्देश आहे ठेवून बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग कार्यरत आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना विविध विषयांचे प्रशिक्षण मिळावे, पुढची पिढी सुसंस्कृत, विकसित व्यक्तिमत्वाची व आदर्श नागरिक बनावी यासाठी बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये दरवर्षी उन्हाळी व हिवाळी शिबिर घेण्यात येते.

या शिबिरांमध्ये लाखो विद्यार्थी सहभागी झाले. आई-वडील-गुरूंचे महत्व, अभ्यास कसा करावा, स्तोत्र – मंत्रामागील विज्ञान, आहार – विहार यासह विविध विषयांचे मार्गदर्शन, योगासन – सूर्यनमस्कार, नित्यसेवा, 14 विद्या 64 कलांचे प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, वैदिक गणित व मेमरी टेकनीक प्रशिक्षण, 16 विभाग आधारित नाटिका, गुरुप्रणाली नाटिका, पालकसभा आदि विविध प्रशिक्षण व उपक्रम यामध्ये घेण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश होता.

विविध तालुक्यातील हजारो बालसंस्कार प्रतिनिधींनी व युवा सेवेकऱ्यांनी सेवेचे योगदान दिले

शिबिराची वैशिष्ट्ये
⭐एकाच दिवशी एकाच पध्दतीने इतक्या मोठ्या संख्येत शिबिर संपन्न झाली
⭐संपुर्ण महाराष्ट्र व देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला
⭐आई – वडील – गुरुजन यांना नमस्कार करण्याचे महत्व, आहार, प्राचीन भारतीय कृषी, स्तोत्र – मंत्रामागील विज्ञान यावर मार्गदर्शन
⭐16 विभाग आधारित नाटिका सादरीकरण
⭐गुरुप्रणाली नाटिका सादरीकरण
⭐भगवान श्री कृष्णाचे खेळ
⭐शिवनकाम, हस्तकला, पर्यावरण पूरक वस्तु बनविने, विविध प्रकारच्या रांगोळी काढणे आदि 14 विद्या – 64 कलांचे प्रशिक्षण
⭐वैदिक गणित व मेमरी टेकनीक प्रशिक्षण
⭐पालक संवाद
⭐सांस्कृतीक कार्यक्रम
⭐विविध स्पर्धांचे आयोजन

मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात निश्चितच या शिबिराचा मोलाचा वाटा असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क:
ईमेल: balsanskar.gurupeeth@gmail.com

संस्कार – संस्कृती – धर्म – देशसेवा