गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांचा संपन्न झालेल्या मराठवाडा स्तरीय मानवी समस्या व कृषी विषयक मार्गदर्शन चर्चासत्र हितगुज

आ.आबासाहेब यांचे हितगुजातील अमृतकण:

दि.११/१२/२०१७ ]
कार्यक्रम ठिकाण : देवगाव रंगारी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद , पानवडोद, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद , बाभूळगाव, ता.भोकरदन, जि.जालना

🚩 सात्विक अन्न खाल्ले असता माणसाचे विचार सात्विक होतात, आपले मन घडविण्यात १०% अन्नाचा वाटा असतो.
🚩 प.पू.गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०१८ रोजी येथे होणारा लिंगार्चन सोहळा होऊ घातला आहे. रामेश्वर येथील समुद्राची पाणी आपल्या विहारीत टाकले असता अनेक चांगले फायदे होतात.
🚩 समुद्री मीठ हे जलतत्वाचे असल्यामुळे शरीरास घातक असते त्याच प्रमाणे सैंधव मीठ पृथ्वी तत्वाचे असल्यामुळे आरोग्यास चांगले असते.
🚩 ज्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाही त्या उणिवा बालसंस्कार विभागातून शिकवल्या जातात.
🚩 भृण हत्या मोठे पातक आहे, त्यांना भविष्यात संतती सुख मिळत नाही.
🚩 विपुल पर्जन्यासाठी आंबा, साग, वेत लागवड करावे.
🚩दर चौथ्या शनिवारी १२:३० वाजता गुरुपिठावर कृषि, बालसंस्कार, स्वयंरोजगार, विवाह संस्कार, पर्यावरण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
🚩 किमान १० गुंठ्यात दिंडोरी प्रणित शेतीचा प्रयोग करावा.

  [ दि.१२/१२/२०१७ ]
कार्यक्रम ठिकाण : मंठा: जि.जालना , पाथरी: जि.परभणी,  जिंतूर: जि.परभणी 

🚩 मुलांसमोर राष्ट्र पुरुषांचे फोटो समोर ठेवल्यास संकटाच्या प्रसंगी त्यांचे स्मरण होऊन संकटाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळेल.
🚩 भागवत ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे; जे पालक मुलांवर संस्कार करण्यास कमी पडतात त्यांचे पाल्य गुन्हेगारी प्रवृत्तीने वागतात, समाजात हैदोस मांडतात असे पालक कुंनामक नरकात जातात
🚩 अन्न हेच औषध आहे. सर्व अन्नधान्यात औषधी गुण आहेत.
🚩 सेवा मार्गातील १६ विभाग कार्यरत झाले तर समाजाचे सर्व मानवी समस्या, प्रश्न सुटतील.
🚩 सेवा मार्गाचा कृषिशास्त्र विभाग प्रत्येक गावात कार्यरत झाल्यास शेतकऱ्याच्या अनेक समस्या सुटतील.
🚩 विवाह नोंदणी विनामुल्य आहे, सेवा मार्गातील विवाह संस्कार विभागातून सर्वांना सात्विक स्थळे मिळतील. सर्व सेवा केंद्रांतील प्रतिनिधींनी पुढे येऊन विवाह संस्कार विभागाचे कार्य जनमानसात पोहोचवावे.
🚩 प.पू.गुरुमाऊली सांगतात: हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका.
🚩 रुद्र तिर्थ घरातील आजारी व्यक्तीस दिल्यास आजारपण दूर होते, त्याच प्रमाणे व्यसनी व्यक्तीस दिल्यास व्यसनमुक्त होतात.
🚩 आंबा, वेत, साग हि झाडे पावसाला आकर्षित करतात. त्यामुळे त्यांची जास्त प्रमाणात लागवड करावी.

[ दि.१३/१२/२०१७ ]
कार्यक्रम ठिकाण : पूर्णा: जि.परभणी, हदगाव: जि.नांदेड

🚩 स्वयंरोजगार विभागात नोंदणी करून विनामुल्य प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध करता येतो.
🚩 ऋषी हे पूर्वीचे शास्त्रज्ञ होते. आज अनेक देशी-विदेशी शास्त्रज्ञ आपल्या ऋषींचे शास्त्रांचे अभ्यास करत आहेत.
🚩 शाकंभरी पौर्णिमेला बी-बियाणे चंद्रप्रकाशात ठेवली असता त्यातील रोगप्रतिकारक शक्ति वाढते.
🚩 कृषिशास्त्र विभागाच्या संपर्कात असणाऱ्या शेतकऱ्यांना देशी बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील.
🚩 आपल्या गावात शाकंभरी बीज संकलन करून सर्वांना निरोगी करा.
🚩 स्वावलंबी शेती करावयाची असल्यास कृषी शास्त्र विभागाशिवाय पर्याय नाही.
🚩 चेरापुंजी येथे सर्वात जास्त वेताची झाडे असल्यामुळे तेथे सर्वात जास्त पाऊस पडतो. वेताची झाडे पावसाला आकर्षित करतात. पावसाकरिता वेताच्या झाडांची लागवड करावी.
🚩 शेतातील बांधावर झाडे लावली असता झाडावर येणारे पक्षी पिकांवरील अळ्या उचलून नेतील, मधमाश्यानी पोळे केले असता त्या आपले परागीकरणातून आपले उत्पादन वाढवतात.
🚩 आज जगामध्ये सर्वात जास्त दुध देणारी गाय हि भारतीय आहे. देशी गायींचे संगोपन करा.
🚩 गायीच्या शेण-गोमूत्र व गुळापासून तयार केलेले अमृतजल पिकाला दिले असता पिक जोमाने वाढते व रोगप्रतिकारक शक्ति आधिक असते.
🚩 जनमानसाचे प्रश्न दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील विविध विभागातून सोडविण्याच्या उद्देश्याने सदगुरु प.पू.मोरे दादा व प.पू. गुरुमाऊली यांनी विविध ठिकाणी सेवा केंद्र उभारले आहे.
🚩 सेवा मार्गातील विविध विभाग जनमानसात पोहोचवावे.
🚩 विवाह संस्कार विभाग वैवाहिक जीवनात सर्वांना मार्गदर्शक असेल.
🚩 विवाहा नंतर निरोगी, निर्व्यसनी, संस्कारित व सुदृढ
पिढी कशी तयार होईल त्यासाठी गर्भसंस्कार यावरही मार्गदर्शन आपल्या सेवामार्गातील विविध शिबिर आपल्या सेवा मार्गातून आयोजित होतात.
🚩 वड, औदुंबर, पिंपळ हि झाडे लावण्याचे आध्यात्मिक महत्व आहे. हि झाडे लावली असता जस-जसे हे झाड वाढते तस-तशी त्या व्यक्तीची आध्यात्मिक व इतर प्रगती होते.

[ दि.१४/१२/२०१७ ]
कार्यक्रम ठिकाण : लोहा: जि.नांदेड, उदगीर: जि.लातूर

🚩 समाजात समस्याच निर्माण होऊ नये म्हणून सेवा मार्गातील विभाग रुजवा.
🚩 वृद्धाश्रम बंद करायचे असेल तर बालसंस्कार विभाग पुढे आणावा लागेल.
🚩 घरातील गृहलक्ष्मीने पाच मुठ धान्य पेरणी करावी. पेरणी करतांना स्वामींचे चिंतन करावे.
🚩 देशी (गावरान) गाई व देशी (गावरान) बियाणे या देशाला तारणार आहे.
🚩 आपण दररोज प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भाज्या, धातू, काचेच्या कचऱ्यात टाकतात हे गायींच्या पोटात जाते व नकळत गोहत्येचे पातक आपल्या माथी लागते.
🚩 गायीच्या शेण-गोमूत्रात ३३ कोटी बॅक्टेरिया असतात. जे देवासारखे काम करतात.
🚩 गुरांच्या शिंगांना रंग न देता गेरू, ताक इत्यादी शिंग घासून लावावे ऑइल पेंट लावल्यास कँसरसारखे आजार उद्भवतात.
🚩 शेतीतून चांगल्या अन्नासोबत चांगल्या संस्काराचे संवर्धन होते. वातावरण बदलण्याची ताकद बियाण्यात आहे.
🚩 घरचे बियाणे, घरची व्यक्ती, घरच्याच खताने शेती करा.
🚩 स्वावलंबी शेती हि ज्ञानातून व परिश्रमातून फुलते.
🚩 सर्व देशातील शास्त्रज्ञ नैसर्गिक, सेंद्रीय शेती मॉडेल बघण्यासाठी दिंडोरी येतात.
🚩 ज्ञान व निसर्गाच्या मदतीने फायद्याची शेती शिकवली जाते.
🚩 घोळू, चील, आंबाडा, लाल माठ यांसारख्या अनेक तणभाज्या व रानभाज्या तयार करून खाता येतात. यांमध्ये औषधी गुणधर्म असतात.
🚩 सेवेकऱ्यांनी केंद्रातील ज्ञान ग्रामअभियानाच्या माध्यमातून १६ विभाग सर्वांपर्यंत पोहोचवावे.
🚩 टी.व्ही. मोबाईलच्या आहारी जाण्यापेक्षा निसर्गाच्या आहारी जा.
🚩 केंद्र हे सर्व जाती-धर्मियांचे ज्ञानाचे केंद्र आहे.
🚩 सामुदायिक प्रार्थनेतून मानवी समस्यांचे निराकरण होते.