महाशिवरात्री (दिंडोरी प्रणीत उत्सव) (माघ कृ. १४) (दि. १३ फेब्रुवारी २०१८)

                माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते. पण माघ कृ. पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात. शंकराला अभिषेक लघुरूद्र, महारूद्राने करतात. बेलाची पाने भक्तीभावाने वाहतात.

                शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की, ‘शिव’ म्हणजे कल्याणप्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंची पर्यंत पोहोचले पाहिजे. शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरुन जातांना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागातात. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासूण वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्व पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो ‘देव’ विषपान करतो तो ‘महादेव’ म्हणून शंकराला निलकंठ म्हणतात. भगवान शंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिबकणारे थेंब-थेंब पाणी सातत्या सुचविते.

भगवान शंकरांची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी

करावी ती पुढीलप्रमाणे.

सेवा केंद्रात श्री दत्त

महाराजांच्या फटो शेजारी भगवान श्री शंकरांचा

फोटो

सकाळी 8 च्या आरतीपूर्वी ठेवावा. सकाळी 8 च्या आरतीनंतर श्री भगवान शंकरांच्या पिंडीची ‘षोडशोपचार पूजा ग्रंथात’ दिल्याप्रमाणे षोडशोपचार पूजा करावी. अभिषेक हा षोडशोपचार पूजेतीलच एक भाग असल्याने अभिषेक सुरू झाल्यावर पुढील क्रमाने अभिषेक, स्तोत्र व मंत्राचे पठन करावे.

1) श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा

2) संस्कृत/मराठी रूद्र 1 वेळा

3) गायत्री मंत्र 1 माळ

4) संजीवनी मंत्र 11 वेळा

5) अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा

6) महामृत्युंजय मंत्र 11 वेळा

7) कालभैरवाष्टक 1 वेळा

8) शिवकवच स्तोत्र 1 वेळा

9) शिवमहिम्न संस्कृत/मराठी 1 वेळा

10) द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा

11) रामरक्षा 1 वेळा

12) श्रीसूक्त 1 वेळा

13) शिव अष्टोत्तरशत नामावली 1 वेळा

14) शिवहर शंकर नमामी शंकर..हा मंत्र 11 वेळा

 

 स.10.30 वा. च्या आरतीला सकाळच्या3 आरत्या, सायंकाळच्या 2 व भगवान श्री शंकरांची आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना व जयजयकार करून प्रसाद घ्यावा.फराळाचे 6 नैवेद्य समर्पण करावेत.

नैवेद्यात फळे, विडा व दक्षिणा ठेवावी. सायंकाळी नेहमीच्या आरत्यानंतर श्री भगवान शंकराची 1 आरती, मंत्रपुष्पांजली, जयजयकार व प्रार्थना करून प्रसाद व अभिषेकाचे तीर्थ घ्यावे.

श्री भगवान शंकराची आवडती फुले :

बेल, केवडा, कुंद, पांढरी कण्हेर, कोरांटी

शिवरात्रीस सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकर्‍यांनी उपवास करावा. महाशिवरात्रीस भगवान शंकरांच्या पिंडीवर दहीभात लेपन करु नये. दहिभात लेपनाचा कार्यक्रम फक्त श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशीच करावा.

अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती पार्वती मातोश्रींसाठी 8 फूट लांब 32 इंच रूंद अशी हिरवी साडी, हिरवा खण व नारळ त्यांची ओटी एका पाटावर काढून ठेवावी. सायंकाळी आरतीच्या आधी भगवान श्री शंकराच्या पिंडीवर 108 बिल्वपत्रे अष्टोत्तरशत नामावली म्हणत वहावी.

 

शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो । 

हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥