धुलिवंदन (फाल्गुन कृ.१) (दि.१ मार्च २०१८)

होळी हा सण पाच दिवसांचा असतो. दुसरे दिवशी ‘धुळवड’ हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म यात विद्युत, उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण संधिकाळाशी संबंधीत आहे. आपला प्रत्येक सण संधिकालाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात, तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्म लेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गुण सुद्धाशरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेत पण ते त्वचारोग दूर करणारेही आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडासंमार्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या घरात उष्णता कमी भासते, शांतता,पवित्र्य वाटते हा अनुभव आहे. म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सचैल स्नान, भस्म स्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायू स्नान, सूर्य स्नान यांचे महत्व आहे. त्याचे अद्भूत असे अनुभवही आपल्याला पाहायला मिळतात.
श्रावणीच्या दिवशी सुद्धा असे सांगितले आहे. या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. आयुर्वेदाचे ऋषी सुश्रूत सांगतात, शिशिर ऋतुत झालेला कफ वसंत ऋतूत पातळ होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदि रोग होतात. ते निवारण्याकरिता मोठ्याने बोलणे, गाणे वाजवणे, नाचणे, पळणे इत्यादी व्यायाम प्रकाराने कफाचे विकार होत नाहीत. आज आपण याच साठी हास्यक्लब चालवत आहोत. पूर्वीच्या काळाचे हास्यक्लब हेच होते म्हणून होलीकोत्सवात नाच, गाणे, ओरडणे, वाजवणे सुद्धा शास्त्रधारित आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड, राख फेकणे हा खेळ खेळतात पण त्याबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घालतात, म्हणजे त्यांना उन्हाळा बाधत नाही.