गुढीपाडवा (चैत्र शु.१) (दि. १८ मार्च २०१८)

या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून राम नवमीपर्यंत “श्रीरामरक्षा” पठन करावी. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनींनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीची १४/११ पारायणे करावीत. चैत्र शुद्ध प्रतिपदेस “ब्रम्हध्वजारोहण” करतात. म्हणजेच गुढी उभारतात.

या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून राम नवमीपर्यंत “श्रीरामरक्षा” पठन करावी. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनींनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीची १४/११ पारायणे करावीत.

चैत्र शुद्ध प्रतिपदेस “ब्रम्हध्वजारोहण” करतात. म्हणजेच गुढी उभारतात.

कृती :- सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्यांच्या समवेत निंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ या गोष्टी एक सूत्राने पक्का बांधून त्यावर कलश सदृश एखादे पत्र उपडे झाकावे. ही गुढी आपल्या गृह्प्रवेशासमोर (जवळ) उभी करावी व ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली पाट नैवेद्यासाठी ठेवावा, रांगोळी काढावी, दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. पुढील ध्यान मंत्रा गुढी उभारण्याच्या आधी म्हणावा.

“ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभिष्ट फलप्रदे I

प्राप्तेSस्मिनसंवस्तरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु II “

अर्थ :-

ब्रम्हाचे प्रतिक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे, ही प्रार्थना. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर “ओम् ब्रह्मध्वजाय नमः I” या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा श्री स्वामी समर्थ सेवा मासिकात दिल्याप्रमाणे करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभारावी. घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील “श्री गणेशाचे पूजन” करावे. पंचांगात प्रारंभी दिलेले संवस्तर फल वाचावे. दुपारी सर्व शेतकरी सेवेकऱ्यांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात सितामातेचा नैवेद्य पुरावा.

चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची ३ इंच लांबीची मुळी आणावी. ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू पाटावर ठेवून त्याची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिल्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते.

या दिवशी कडुलिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून घ्यावे, व ते मिश्रण घरातील सर्व लहान मोठ्यांना द्यावे. कडूनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतूनाशक, आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक राहिले असले तरी त्याचे नित्य अनाशापोटी सेवन केल्यास शरीर सुधृढ, निरोगी राहते.

त्याचा अनेक रोगांवर उपयोग होतो. या सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ करावा. फक्त विवाह व उपनयन (मुंज) यास हा मुहूर्त नाही. .