प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (एप्रिल २०१८)

* देश- विदेश, राज्य व गावपातळीवर चालणारे सेवामार्गाचे हे कार्य सुसूत्रतेने चालावे, सर्वत्र
सारखेपणाचा जीवनादर्श शिकण्यासाठी व आचरण्यासाठी सर्व सेवेकरी मासिक सत्संगाला
उपस्थित राहत असतात.

* मी’ पणा, अहंकार वजा केल्यास आपण स्वामी चरणांपर्यंत पोहोचतो.

* व्हाट्सअॅप, फेसबुकसारख्या यंत्रणा कालांतराने बंद होणाऱ्या आहेत, त्याचा अतिरिक्त वापर टाळावा; या यंत्रणांच्या अती आहारी जाऊ नये.

* श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमश: 3 अध्याय वाचन, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तसेच दैनंदिन नित्यसेवा करावी.

* काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षडरिपू त्याग करावा, दमन करावे.

* सेवाकेंद्राच्या परीसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक यांना केंद्रात आरतीसाठी सहभागी करावे. विद्यार्थ्यांना प्रहरे सेवेत सहभागी करून घ्यावे.

* अध्यात्म व विज्ञान याची सांगड घालता आली पाहीजे.अंधश्रध्दा जोपासू नये भक्तीयुक्त श्रद्धा असावी.

*  विभागातील सेवेकर्‍यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आपआपल्या आवडीचे काम स्वेच्छेने करावीत. कोणा-एकाच्या दडपणाखाली काम करु नये. प्रत्येक सेवा केंद्र हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आहे असे समजून कार्य करावे.

*  प्रश्‍नोत्तर सेवा करणार्‍या सेवेकर्‍यांनी सेवा समजावून सांगण्यासाठी ग्राम व नागरी अभियानातील सर्वच विभागातील माहितीचे ज्ञान आत्मसात करावे, त्यासाठी अभ्यासक व्हावे.

अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक एप्रिल २०१८ संपर्क.(०२५५७)२२१७१०