संत एकनाथ षष्ठी (फाल्गुन कृ.६) (दि. ७ मार्च २०१८)

राष्ट्रीय संत एकनाथ महाराज हे मराठीतील भगवान व्यासच आहेत. त्यांचे शिष्य संत एकनाथ होय. या परंपरेुळे श्री स्वामी समर्थ महाराजांना, दत्तसप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय व इतरअनेक संप्रदाय यांना एकाच ठिकाणी आणून भारतीय संतांची एकात्मता साधावयाची होती. संत एकनाथ महाराज यांचे घरी भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने राहिले व पाणी भरण्यापासूनची सर्व कामे केली. आजही संत एकनाथ महाराजांच्या पैठणच्या घरातील रांजण भगवान श्रीकृष्ण स्वत: गुपचूप येऊन भरतात. अशा या महान परमेश्वराच्या श्रेष्ठ भक्ताचे स्मरण एकनाथ षष्ठीच्या दिवशी आपण सर्व सेवेकर्‍यांनी करावे.