जागतिक कृषी महोत्सव२०१८: सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी

सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी

स्थळ: डोंगरे वसतीगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक | दिनांक: २९ एप्रिल, २०१८ | वेळ:दु.२  

मान्यवर / महोदय…

स.नमस्कार

श्री स्वामी समर्थ कृषी शास्त्र विभाग दिंडोरी जि.नाशिकच्या वतीने गेल्या ७ वर्षा पासून नाशिक येथे कृषी महोत्सव आयोजित केला जातो.कृषी महोत्सवाची प्रेरणा श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास प्रधान केंद्र दिंडोरी जि.नाशिक प्रमुख प.पू.गुरुमाऊलींकडून मिळाली.

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत हाच शासकीय यंत्रणेचा पाया आहे.ग्रामअभियान संकल्पना जनते पर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक हे स्थानिक पातळीवरील महत्वाचे घटक असल्याने सरपंचाना गाव विकासाची दिशा मिळण्याचे दृष्टीने कृषी महोत्सवात “सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी” घेण्यात येते.

सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी उदिष्टये…

 • गावाच्या विकासाला वेग यावा म्हणून मान्यवर तज्ञाचे मार्गदर्शन.
 • आदर्श गाव बनविणाऱ्या सरपंच/ग्रामसेवकांचा सन्मान.
 • सर्व धर्म समभाव असणाऱ्या गावाचा सन्मान.
 • शासन,प्रशासकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना एकत्रित करणारे व्यासपीठ.
 • राष्ट्रप्रेमी व सुदृढ पिढी निर्माण होण्यासाठी बालसंस्कार व युवा प्रबोधन व्हावे.
 • युवकांच्या रोजगार निर्मितीची सोय झाल्यास गाव स्वावलंबी होण्यास मदत होईल.
 • सामुदायिक विवाह किंवा साध्या विवाह पद्धती ज्यात मानपान, हुंडा, कर्कश्य वाद्य या गोष्टीना हद्दपार करणे. जेणे करून गावातील नागरिक कर्जबाजारीपणापासून दूर राहील.
 • वृक्षरोपणातून पर्यावरण रक्षणाचे कार्य व्हावे.
 • ग्राम स्वच्छते सोबतच पाणवठा व नदी शुद्धीकरणाचा विचार व्हावा.
 • गावात गोशाळा, सामुहिक धान्य कोठार, दुग्ध व्यवसायासारखे शेती पूरक जोड व्यवसायांना चालना मिळावी.
 • स्वावलंबी शेतीसाठी शेतीतून सात्विक अन्न,धान्य, भाजीपाला, फळेउत्पादनाकडे कल वाढवावा. यारीतीने गावाचे आरोग्य आबाधीत राहील.
 • ग्रामदैवतांचा दरमहा मानसन्मान केल्यामुळे गावात एकी टिकते, व्यसनाधितेला आळा बसतोव गाव-परिसरात योग्य वेळी पर्जन्य होते.

कृषी महोत्सव ‘सरपंच / ग्रामसेवक मांदियाळीत’ मान्यवरांचे मार्गदर्शनाने प्रायोगिक तत्वावर

काही गावे ग्रामाभियान अंतर्गत सक्षम करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने..?

 • गावाच्या विकासासाठी सरकारी योजनांचे प्रबोधन करणे.
 • कृषी महोत्सवात सामील झालेल्या काही मान्यवर समाजसेवी कंपन्याकडून गावासाठी C.S.R. योजनेचे मदत मिळविणे.
 • गावपातळीवर धार्मिक स्थळे, तपासणी, करणे.(याज्ञिकी विभागाच्या मदतीने)
 • दरमहा शेतकरी व युवकांसाठी प्रबोधन वर्ग घेणे.
 • अल्प खर्चात शाश्वत शेती उत्पादन कसे घ्यावे याचे मार्गदर्शन करणे.(कृषी शास्त्र विभागाच्या साह्याने)
 • शेती जोड व्यवसायाचे मार्गदर्शन.
 • गावातील युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करणे.(स्वयंरोजगार विभाग)

        आयोजक

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रधान केंद्र दिंडोरी व श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, ता.दिंडोरी जि.नाशिक