कृषी महोत्सवात सर्व जातीय धर्मीय शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी निशुल्क वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

विवाह संस्कार  विभाग

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या “विवाह संस्कार विभागाद्वारे”  दि. २६/०४ /२०१८रोजी डोंगरे वस्तीगृह मैदान, गंगापूर रोड, नासिक- वेळ: सकाळी : १० ते दु.१”  सर्व जातीय धर्मीय शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी निशुल्क वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ठीक १०:०० वाजता प.पू.गुरुमाऊली यांचे शिष्य तथा सुपुत्र आदरणीयआबासाहेब मोरे, मा. विभागीय धर्मादाय आयुक्त, नाशिक व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व मान्यवरांचे मनोगतव्यक्त करून विवाह मेळाव्यास प्रारंभ होईल.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या विवाह संस्कार विभागाद्वारे आजतागायत हजारो विवाह जुळविण्यात आलेले आहेत व यशस्वी झाले आहेत.विवाह विषयी समाजातील अनिष्ठ रूढींविषयी (हुंडा, रुसवे-फुगवे, मान-सन्मान, अन्नानासाडी वगैरे) समाज प्रबोधन करून त्यांचे समूळ उच्चाटन करणे हीच विवाह संस्कार विभागाची प्रमुख उद्दिष्ट आहेत.

कर्जबाजारीपणा, सततचा दुष्काळ, नापिकी, शहराकडे तरुणाईचा वाढणारा ओढा, शेतीतील कामांविषयी वाढलेली अनास्था  इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. या मेळाव्यातून शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना सुयोग्य जोडीदार मिळण्याची सुवर्ण संधी आहे. या मेळाव्यात पूर्व नोंदणीसाठी नजीकच्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील विवाह प्रतिनिधींशी संपर्क करावा किंवा ७७५५९४१७१०, ०२५५७-२२१७१० या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.परिचय मेळाव्यात जमलेले विवाह श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे विनामुल्य सामुदायिक विवाह पद्धतीने करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.या आधी नोंदणी झालेल्या उपवर वधूंची २०१७-१८ ची वधू-वरसूचीपुस्तिका व वेबसाईटवर तयार करण्यात आली असून त्यात हजारो उपवर वधू-वरांची माहिती उपलब्ध आहे. मेळाव्याच्या ठिकाणी विवाह सूची पुस्तिका उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच विवाह इच्छुकांना विवाह स्थळांची माहिती प्रिंट सेवेद्वारे हि उपलब्ध करून देण्यात येते. याच बरोबर विवाहपूर्व व विवाहोत्तर उद्भवनाऱ्या समस्यांवर समुपदेशनपर मार्गदर्शन या विवाह मेळाव्यात होणार आहे.या मेळाव्यासाठी महाराष्ट्र भरतील सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील विवाह प्रतिनिधी गागो-गावी जाऊन शेतकऱ्यांच्या मुलामुलींची नोंदणी करत आहेत या स्तुत्य उपक्रमाला शेतकरी वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.