हजारो सेवेकरी-भाविकांच्या उपस्थितीत प.पू. गुरुमाऊली यांच्या हस्ते गंगा-गोदावरी माता पूजन सोहळा, पंचवटी, नाशिक येथे संपन्न

दरवर्षी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने “सुपर्जन्य वृष्टी व दुष्काळचे निवारण” होण्यासाठी प.पू. गुरुमाऊली यांच्या हस्ते गंगा-गोदावरी माता पूजन सोहळा आयोजित करण्यात येत असतो.

यावेळी गंगा-गोदावरी मातेचे पूजन केल्यानंतर प.पू. गुरुमाऊली यांनी हितगुजात सांगितले कि,

सु-पर्जन्यवृष्टी, दुष्काळनिवारण करण्यासाठी सर्वांनी मिळून पर्जन्य देवतेची सेवा करावी. पर्जन्यसूक्ताचे वाचन, हवन केले पाहिजे असे नमूद केले.