जागतिक कृषी महोत्सव(८वे) दि. २५-२९ जानेवारी २०१९ (स्थळ: नाशिक)

कृषी महोत्सवाचे मुख्य विषय

१) राष्ट्रीय कृषी प्रदर्शन

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचे खते, औषधे, आधुनिक यंत्र सामग्री, सेंद्रिय / जैविक तंत्रज्ञान, शेती उपयोगी विविध अवजारे, बी-बियाणे, पशुखाद्य, अपारंपरिक ऊर्जा, प्रक्रिया उद्योग, पॉलीहाऊस, कृषीविमा, बँक, कृषी पर्यटन व कृषी संबंधित वैविध्यपूर्ण बाबींचा सहभाग.

२) भारत व कृषी संस्कृती दर्शन

कृषी व भारतीय संस्कृतीमधील सण-उत्सव व १२ बलुतेदार पद्धती जिवंत देखावा मांडणी. पूर्वीचे समृद्ध पर्यावरणपूरक गाव व त्यातील विज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शन एकाच छत्राखाली.

३) पशु व गौवंश प्रदर्शन

भारतीय पशु-गौवंशातील विविध प्रजातींसह प्रात्यक्षिक माहिती, पशुखाद्य, मुरघास, हायड्रोफोनिक, चाऱ्याचे विविध प्रकार, डेअरी उत्पादन व आधुनिक तंत्रज्ञान व दुग्धव्यवसाय बद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.

४) दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन

दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन दुर्मिळ वनौषधींच्या प्रदाशानाद्वारे आयुर्वेदिक शेती व बाजारपेठ माहिती, आहार, विहार पथ्य तसेच दुर्मिळ वनौषधी, नक्षत्रवन मांडणी, cancer, मधुमेह यांसारखे असाध्य आजारांवर उपयोग आणि पर्यावरण, नैसर्गिक, सामाजिक, व आध्यात्मिकदृष्ट्या असणारे महत्व विषद करून लोकसहभागातून कृतीशील प्रबोधन.

५) कृषी पर्यटन

आज पुन्हा एकदा “गावाकडे चला” म्हणण्याची वेळ आली आहे. शहरी माणसांना गावाकडच्या मातीची ओढ असते तर ग्रामीण भागात सोबत पूरकव्यवसायाची गरज असते यांना एकत्रित करण्याची कृषी पर्यटन हि संकल्पना रुजू होण्याची वेळ आली आहे. हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे. म्हणूनच यातून रोजगार निर्मिती, भारतीय संस्कृतीचे संवर्धन, पर्यावरण पूरक जीवन शैली टिकून राहावी, याचे प्रात्यक्षिकासह माहिती या कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

अधिक माहितीसाठी :

जागतिक कृषी महोत्सव वेबसाईट:  http://krushimahotsav.org/