प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (ऑक्टोंबर २०१८)

* सदगुरु परमपूज्य पिठले महाराजांचे व्यक्तीमत्व अतीशय नम्र स्वरूपाचे होते, त्यामुळेच त्यांनी अध्यात्मात महान कार्य केले. कारण अंगी प्रचंड भगवान श्री दत्तात्रेय व श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात गुरुतत्व आहेत…! नम्रता असल्याखेरीज अध्यात्म शोभून दिसत नसते.

* श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील सर्व विभाग अथवा उपक्रम हे केवळ देशहितार्थ व देशसेवेसाठी आहेत.

* मानवी शरीर हे त्रिदोषजन्य असते. मुळातच कफ, वात व पित्त प्रकृती घेऊनच मनुष्य जन्मास येत असतो. आहारात षडरस अत्यंत महत्वपूर्ण असतात त्यातल्या त्यात कडू व तुरट रस अत्यंत उपयुक्त असतात आणि नेमका त्याच रसांनी युक्त आहार आपण कमी प्रमाणात सेवन करतो.

* उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची आजार वाढविणारे असतात. डॅाक्टरांनी रुग्णांना प्रथम पथ्य-अपथ्याचे मार्गदर्शन करावे त्यानंतर औषधोपचार करावेत, कारण ही काळाची गरज बनली आहे. आज जनतेत आहाराविषयी प्रचंड गैरसमज व संभ्रम आहेत.

* श्रद्धेने केलेल्या सेवेला ‘श्राद्ध’ असे म्हणतात. पितरांच्या सेवेनेच देव प्रसन्न होत असतात.

* रासायनिक खतांचा वाढता वापर, मोबाईलचा अतिवापर व जर्सी गाईचे दूधाचा वापर इत्यादींमुळे कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते

* अजातशत्रू सारखे कार्य सदगुरु परमपूज्य पिठले महाराजांनी केले आहे, श्री गायत्री मंत्राची अनेक तप:श्‍चरणं करून तेजाची अत्यंत अवघड अशी साधना केली आहे.

अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक ऑक्टोंबर २०१८. संपर्क: (०२५५७) २२१७१०