प्रशासकीय विभाग

प्रशासकीय विभाग: अधिकृत सूचना व आवश्यक माहिती 

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे देशभरात कार्यरत असणाऱ्या सेवाकेंद्राच्या कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता असावी याकरीता श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी येथे प्रशासकीय विभाग कार्यरत असून सेवाकेंद्राचे प्रशासकीय कामकाज करणाऱ्या सेवेकरी प्रतिनिधींसाठी दरमहा चौथ्या शनिवारी मासिक सत्संगाच्या दिवशी देशभरातील प्रशासकीय सेवेकाऱ्याना या विभागातून मार्गदर्शन करण्यात येते.

सर्व सेवेकरी व प्रतिनिधींसाठी महत्वपूर्ण सूचना

देणगी व अन्नदान या विषयक सूचना

  • अयशस्वी व्यवहार 100% परतावा.
  • बँकेचे शुल्क देणगीदारास देय असेल .
  • एकदा दिलेली देणगी रद्द करता येणार नाही.
  • सेवा अधिष्टीत उत्पादनांच्या देणगी मूल्याचा परतावा न देना सेवेचा कालावधी वाढवून देण्यात येईल.
  • उदा. SMS आणि व्हॉइस कॉल सेवा, स्वामी सेवा मासिक/त्रैमासिक,विवाह- SMS किंवा ईमेल सेवा इत्यादी.