१.बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग

बालसंस्कार व युवा प्रबोधन या विभागाच्या माध्यमातून सृजन व सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य होत असून मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी केंद्र, गाव शाळा व वाडे, वार्ड, कॉलनी, अनाथलय, आश्रमशाळा, इत्यादी ठिकाणी बालसंस्कार वर्ग सुरु करून विद्याथ्यांना सर्वगुणसंपन्न बनविणे, त्यांचे आत्मबल मनोबल वाढवून, आई-वडील, शिक्षक, अतिथी तसेच देश इ. विषयक आदर निर्माण करणे, मूल्यशिक्षणातुन संस्कार, नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे हे महत्वपूर्ण कार्य या विभागातून केले जाते. याच बरोबर विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व समाजशील घडावेत म्हणून पर्यावरण शिक्षण, परसबाग (सेंद्रिय व नैसर्गिक शेती), कायदा जागृती, विविध कला, क्रीडा, कौशल्य विकास, स्तोत्र मंत्रांचे पठाण व त्यातील विज्ञान ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनाविषयी जागृती, सुसंकल्प करणे असे विविध उपक्रम राबविले जातात, याच बरोबर पालकसभांचे आयोजन, हिवाळी व उन्हाळी शिबिरे तसेच युवा वर्गासाठी स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षा, मुलाखतीबद्दल मार्गदर्शन व प्रशिक्षणे या विभागाद्वारे दिली जातात. प्रतिमाह चौथ्या शनिवारी मासिक सत्संगाच्या निमित्ताने सर्व बालसंस्कार प्रतिनिधींना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने सर्व प्रतिनिधी आपापल्या विभागात विनामुल्य सेवा करतात.

संपर्क : ०२५५७-२२१७१०, ०२५९४-२३३७०७

अधिक माहितीसाठी :http://balsanskar.dindoripranit.org/