५.कृषीशास्त्र विभाग

श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील कृषीशास्त्र हा एक महत्वाचा विभाग असून कृषक बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना सुखी, समृद्ध व स्वावलंबी करण्यासाठी पारंपारिक शेतीला अध्यात्म व विज्ञान यांची योग्य सांगड घालून सहज सोप्या पद्धतीत प्रशिक्षणातुन प्रशिक्षित केले जाते.शेतेतील विविध समस्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच मनोबल वाढीसाठी राष्ट्रीय कृषी सत्संग मेळाव्याद्वारे प्रभोधन केले जाते. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलातील दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय/नैसर्गिक शेतीद्वारे जैव विविधतेची जोपासना करणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी देशी गावरान बियाणे संवर्धन व प्रचार – प्रसार , देशी गौवंश संगोपन, घरगुती खते औषधे निर्मिती, खेडयांकाडून शहराकडे होणारे स्थानांतर टाळण्यासाठी ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण व गटशेतीद्वारे कृषिपूरक जोडव्यवसाय व प्रक्रिया निर्मिती, करून बाजारपेठ उपलब्ध करणे, भौगालिक स्थितीला अनुकूल स्थानिक पीक पद्धतीनुसार जिल्हानिहाय दिंडोरी प्रणीत आदर्श शेती मॉडेल तयारकरण्याचे महत्वपूर्ण कार्य या विभागातून केले जाते.

संपर्क: (02557)221710,7757008652

अधिक माहितीसाठी :krushi.dindoripranit.org