अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३) (१८ एप्रिल २०१८)

हा दिवस चार प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही.

हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी १२ वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा.

घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून, हात जोडून पितृस्तुती म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन करतांना खाली गहू ठेवणे.

या दिवशी पितरांना उदककुंभ दान करतात. पत्रावळीवर तांदुळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा. त्यात गंध, ङ्गुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटास सूत्राचे वेष्टन करावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा.

या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इ. पुण्यकर्म अक्षय्य टिकते म्हणून ‘अक्षय्यतृतीया’ ही शुभतिथी प्रमाणे पितृतिथी आहे. पितरांचे ऋणफेडण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गंगास्नान, यज्ञ होम, यवदान, यवभक्षण करावे. पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभ निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी-कुंकू समारंभ करावयाचा असतो.