भाद्रपद वद्य पंधरवडा: महालय (भाद्रपद कृ. प्रतिपदा ते अमावस्या) दि.२५ सप्टें-९ ऑक्टो

या काळाला पितृपक्ष म्हणतात. या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान त्यांच्या नावाने करावे. सद्गृहस्थास जेवू घालावे. पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त पठण व हवन करावे.

नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले तरी चालते. तसेच या दिवशी व प्रत्येक अमावास्येला दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात, थोडे तप, ५-७ काळे तिळाचे दाणे घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांनाही सद्गती लाभते.

मध्व: सोास्याधिना मदाय प्रत्नो होता विवासते वाम। बर्हिष्मती रतिर्विश्रिता गीरिषा यांतनासत्योप वाजै:॥

श्राद्ध दिवशी या मंत्राचा १ माळ जप करावा. घरात सवाष्ण स्त्री गेलेली असल्यास अविधवा नवमीस श्राद्ध घालावे.  ज्या पितरांची तिथी माहित नाही त्यांच्या नावाने अमावास्येस श्राद्ध घालावे तसेच ब्राह्मणास हिरण्यदान द्यावे व अमावास्या मागणार्‍या स्त्रीला शिधा दान करावे.

(टीप: पितृपक्षात नारायण नागबली सारखे विधी करू नयेत.)

अधिक माहितीसाठी नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात संपर्क करावा.०२५५७-२२१७१०