नरक चतुर्दशी (आश्‍विन कृ.१४) दि. ६ नोव्हेंबर २०१८

जगातील पहिला सामुदायिक स्त्रीमुक्ती दिन. नरकासुराने पळवून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले व त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले व स्वत:चे म्हणून सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले. यातून जगातील तमाम मानवास आदर्श घालून दिला आहे की, आपल्या देशात स्त्री भ्रष्ट होते म्हणजे देश भ्रष्ट होतो, असे समजले जाते. व्यासांनी, पूर्वजांनी या स्मृती प्रित्यर्थ हा दिवाळीचा सण सुरू केला. उत्सव म्हणून पहाटे उठून स्नान करायचे असते. या दिवशी सर्व सेवेकरी भगिनींनी श्रीकृष्णाच्या ङ्गोटोस पूजा करून हार घालावा. नैवेद्य दाखवावा व कृतज्ञतापूर्वक त्या भगवानाच्या अगाध लीलांचे कार्यकारण भावात्मक चिंतन, मनन करावे. विष्णू सहस्त्रनाम, गीतेचा १५ वा अध्याय अथवा संपूर्ण गीता पठण करावी, गीतेची १८ नांवे म्हणावी, १ वेळा लक्ष्मी नृसिंह स्तोत्र वाचावे. व्यंकटेश स्तोत्र म्हणावे.