गोवत्स द्वादशी (वसुबारस) (आश्‍विन कृ.१२- दि.४ नोव्हें)

वसूबारसच्या सायंकाळी सवत्स गायीची (वासरासह) पूजा करावी. तिच्या पायावर अर्घ्य देऊन, ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालावा. या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो. त्यामुळे दारासमोर आकाशकंदील लावावा. दाराजवळ, तुळशीजवळ रांगोळी काढावी. दिवे (पणत्या) लावावेत.

श्री गुरूद्वादशी (दिंडोरी प्रणीत उत्सव)

(आश्‍विन कृ.१२) (दि.४ नोव्हेंबर २०१८)

गुरुद्वादशी म्हणजे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या निजधामगमनाचा, नवा अवतार धारण करण्याचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ८:०० चे आरतीपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज व दत्त महाराजांच्या फोटोच्या मध्यभागी ठेवावा. आरती झाल्यावर प्रत्येकाने ११ माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर श्री गुरूचरित्र ग्रंथाचा ९ वा अध्याय एका सेवेकर्‍याने मोठ्याने वाचावा, इतरांनी त्याचे श्रवण करावे. १०:३० च्या आरतीला अन्नाचे ६ नैवेद्य करावे. श्रीपाद श्रीवल्लभांचे आवडीचे पदार्थ नैवेद्यात करावेत.

(टीप: अधिक माहितीसाठी ज्ञानदान भाग १ बघणे.)