आगामी मासिक सत्संग (महासभा) दि. २१ सप्टेंबर २०१९ (३रा शनिवार), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

मासिक सत्संग महासभा येथे परमपूज्य गुरुमाऊली यांचे हितगुज व सर्व सेवेकरी / भाविक / विभाग प्रतिनिधींसाठी बालसंस्कार व युवा प्रबोधन, विवाह संस्कार, कृषीशास्त्र, पशुगौवंश, स्वयंरोजगार, याज्ञिकी इत्यादी विभागातील प्रशिक्षणाचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रशिक्षण लाभ घ्यावा.

दर महिन्याच्या मासिक मिटिंगला हजर राहून इच्छुक विभागात नोंद करा.

अधिक माहितीसाठी संबंधित विभाग प्रतिनिधी संपर्क:

विवाह नोंदणी : संपर्क (७७५५९४१७१०)

स्वयंरोजगार विभाग : संपर्क (७७५५९४१७५३)

माहिती व तंत्रज्ञान विभाग अंतर्गत (सेवेकरी ओळखपत्र व SMS सेवा)  : संपर्क (७७५५९४१७१५ / ९९२२४२००१०)

कृषीशास्त्र विभाग : संपर्क (७७५७००८६५२)

बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग ः (७७२००१००७४)

देश विदेश स्वामी सेवा अभियान विभाग ः (७७२००१००७३)

प्रशिक्षण स्थळ: अन्नछत्र बिल्डींग हॉल क्रमांक १,२,३

संपर्क: (७७५७००८६५२ / ७७५५९४१७१०)

श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर : (०२५९४ – २३३१७० / २०४२५२)

श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : (२५५७-२२१७१०)

 मागील मासिक सत्संग महासभा वृतांत

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर 

ग्राम नागरी विकासाचे सर्व पैलू सामाजिक बांधीलकीशी निगडीत असतात….!

                                                                                                                                    – परमपूज्य गुरुमाऊली

प्रकाशन लोकार्पित साहित्य : श्री स्वामी समर्थ सेवा अंक, श्री स्वामी समर्थ सेवा त्रैमासिके (हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती), श्री स्वामी चरित्र सारामृत (मल्याळम), श्री स्वामी समर्थ व परमपूज्य गुरुमाऊली रेडिअम स्टीकर, श्री गुरुपीठ मोबाईल अ‍ॅप इ.

परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजातील अमृतकण :

* महिनाभरात केलेल्या कार्याचा आढावा म्हणून मासिक सत्संगाचे आयोजन असते. श्री क्षेत्र गाणगापूर येथे अतीशय प्रखर उन्हातही समर्थांच्या सेवेकर्‍यांनी अत्युच्च अशी श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा रुजू केली.

* शालेय विद्यार्थ्यांकडून, बालसंस्कार विद्यार्थ्यांकडून तसेच सर्वधर्मिय बांधवांनी आप आपल्या प्रार्थना स्थळांवर सामुदायिकरित्या पर्जन्यसूक्ताचे पठण करावे. कारण पाणी हे जीवन असून, सर्वांच्याच गरजेचे आहे तेव्हा पर्जन्यदेवतेला आळविण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असते.

* सेवेकरी परिवाराची नवी पिढी गुणवत्ता यादीत यावी, स्वत:च्या पायावर उभी असावी, सनदी अधिकारी व्हावेत म्हणून माता सरस्वतीची सेवा करावी, आगामी काळात शिक्षक-विद्यार्थी व पालक मेळावा श्री क्षेत्र बासर माता सरस्वतीचे जन्मस्थान येथे होणार आहे.

* प्रश्नोत्तर विभागात सर्वदूर एकसारखेपणा असावा. प्रश्नास अनुसरून व प्रश्नकर्त्या व्यक्तीच्या वेळेकाळाला सहजशक्य होईल अशीच सेवा द्यावी, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कमी अवधीत सहजसोपी अशीच सेवा अभिप्रेत आहे.

* विवाहमंडळांनी साखरपुड्यात विवाह असा पायंडाच पाडावा त्यामुळे नव्या पिढीवर हेच संस्कार कायमस्वरूपी होतील व त्याच कृतीचे अनुकरण सर्वदूर समसमान होतील. असे झाल्यास विवाह ह्या संस्कारादरम्यान होणारे रुसवे-फुगवे, मान- सन्मान- अपमान अशा गोष्टींना आळा बसेल

* मान-सन्मान, अपमान या गोष्टी अध्यात्माच्या चिंतनात कायमच्या विसर्जीत कराव्यात.

* नित्यनियमाने पर्जन्यसूक्त पठण केल्यास मृग नक्षत्र कोरडे जाणार नाही.

* पूर्वी शेतकरी पुस्तके वाचून शेती करत नव्हते पण आता काळ बदलला आहे. अभ्यास करून, चिंतन, परिक्षण, निरीक्षण करून शेती करणे क्रमप्राप्त झाले आहे.

* मुलांशी सकारात्मक संवाद, तोलून-मापून गोड शब्दांत करावा, नकारात्मक वाक्य हे नकारात्मक विचार प्रसारित करत असतात.

* देशातील सप्तनद्यांची माती, शेती, प्लॅाट, जमिनीत खड्डा करून पुरल्यास वास्तुदोष नष्ट होतो.

* सेवेकर्‍यांच्या कष्टाचा एक रुपया- हजार कोटी रुपयांपेक्षा लाख मोलाचा असून,

त्यातून निर्माण होणार्‍या प्रतिकृती अजरामर स्वरूपाच्या असतात.

* ऋण काढून सण साजरे करण्यापेक्षा जसे जमेल तसे कार्य करावे, कर्ज काढून सण साजरे करू नयेत.

* चोवीस तत्वदेवता, दशमहाविद्या यंत्र स्वरूपात श्री गुरुपीठात स्थापीत आहेत म्हणून या वास्तुत केलेली सेवा फलद्रूप होते.

* कर्जबाजारीपणा दूर होण्यास प्रभावी उपाय अर्थात श्रीयंत्रपूजन, प्रतिपौर्णिमा घरच्याघरी सत्यनारायण पूजन करावे.

* प्रखर दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून पोटतिडकीने लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वांनी पर्जन्यसूक्ताची सेवा करावी.

* उपासक- अभ्यासक- प्रसारक ह्या मार्गाने गेल्यास अध्यात्म सोपे होईल.

* जन्मोजन्मी दिव्याने दिवा लावण्याची संधी स्वामींनी सर्वांना प्रदान करावी हा आशीर्वाद श्री गुरुपौर्णिमेला मागावा.

* दीर्घायुषी झाडे अहिल्याबाई होळकरांनी काश्मिर ते कन्याकुमारी लावली. अहिल्याबाईंचा आदर्श आज समाजाने घेणे अगत्याचे आहे.