रथसप्तमी-माघ शु. ७ (दि. १२ फेब्रुवारी २०१९)

विस्तृत माहिती:

या दिवशी भगवान श्री सूर्यनारायणाचीपूजा करावी. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करुनसप्त अश्वांच्या रथावर आरुढ झालेल्या भगवान श्रीसहस्त्ररश्मीचे ध्यान करावे व एका तांब्याच्या भांड्यातपाणी घेऊन १ माळ श्री गायत्री मंत्राचा जप करावा. त्यातील निम्मे पाणी श्री सूर्यनारायणाकडे चेहरा करुनअर्घ्य द्यावे व उरलेले पाणी स्वत: प्यावे ही विशेषसेवा एक प्रकारची संध्या म्हणून दिलेली आहे, जेसेवेकरी संध्या करत नसतील त्यांनी रथ सप्तमीच्या दिवसापासून सुरुवात करावी. याच दिवशी ३ वेळा श्री आदित्यहृदय स्तोत्र, १ वेळा श्री सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्कटस्तोत्र व १ माळ श्री सूर्य नारायणांचा मंत्रही सेवा भगवान श्री सूर्यनारायणाच्या चरणी अर्पण करावी.