वसंत पंचमी-माघ शु.५ (दि. १० फेब्रुवारी २०१९)

विस्तृत माहिती:

वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी वाजता भूपाळी आरतीला सर्व सेवेकर्‍यांनी त्यांच्यामुलांसह केंद्रात जमावे. भूपाळी आरती नंतर एकाचौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीसरस्वतीमातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजाकरावी. त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ११ माळी जप करून श्रीमहासरस्वती मातेच्या “ऐं” या बीजमंत्राचा ११ माळी सामुदायिक जप करावा. या जपानंतर सर्व सेवेकर्‍यांनी आपल्या मुलाच्याजिभेवर मधाने दर्भाच्या काडीने (किंवा हाताच्याबोटाने) “ऐं” हा बीजमंत्र लिहावा व सर्वांनी माताश्रीमहासरस्वती व श्रीस्वामी समर्थ महाराज यांनामुजरा करून बालकांची बुद्धी वाढविण्याची प्रार्थना करावी.