🚩 शिव प्रेरणा युवा महोत्सव-शिवतीर्थ रायगड 🚩


युवा प्रबोधन विभाग –

🚩 10 मार्च 2019 किल्ले रायगड, महाड, रायगड जिल्हा🚩

🚩 चलो किल्ले रायगड…

तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड-किल्ले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे आणि आपल्यासाठी तीर्थासमान आहे. अतिशय दिव्य आणि राष्ट्रप्रेमाच्या अद्भुत ऊर्जेने भारलेले हे गड-किल्ले तमाम राष्ट्रभक्तांच्या मनांना आंदोलीत करतात.

युवकांचे जीवन या भावधारेने प्रवाहित होऊन व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्मेषाची अंकुरे प्रफुल्लित व्हावी, या उद्देशाने श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 10 मार्च 2019 रोजी “शिव प्रेरणा युवा महोत्सव – शिवतीर्थ रायगड” आयोजित केला आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तमाम सेवा केंद्रातील तसेच, महाराष्ट्रा बाहेरील गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली आदी राज्यातील सर्व युवक – युवती सेवेकरी यांना आवाहन करण्यात येते कि या दुर्लभ संधीचा अवश्य लाभ घ्यावा!

या युवा महोत्सवात ऐतिहासिक किल्ले रायगड माहिती, शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रेरक घटना आदी विविध बाबींवर इतिहास तज्ञांद्वारे मार्गदर्शन देखील होणार आहे.

या ऐतिहासिक आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी आदल्या दिवशी 9 तारखेला सायंकाळी 6.00 पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी हिरकणीवाडी गावात पोहोचावे लागेल.

 

दिनांक: 10 मार्च 2019

वेळ: सकाळी 10.00

स्थळ: किल्ले रायगड, महाड, रायगड जिल्हा

महत्वाची सूचना :-

या ऐतिहासिक युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दि. 3 मार्च पर्यंत खालील लिंक मध्ये जाऊन नोंदणी फॉर्म भरणे बंधनकारक आहे

अधिक माहितीसाठी संपर्क:

7709107339

7720010074

8055714433

9850091499

नोंदणीसाठी पुढील लिंकवर जाऊन फॉर्म भरावा:

https://goo.gl/forms/0FdrkqpCqeiqfSV62

🚩 चलो किल्ले रायगड…

संस्कार – संस्कृती – चारित्र्य निर्माण – राष्ट्र निर्माण!