भारतमातेच्या व  देशवासीयांच्या संरक्षणासाठी, श्री पिताम्बरा चण्डी याग संपन्न

परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार संभाव्य धोक्यापासून भारतमातेच्या व  देशवासीयांच्या संरक्षणासाठी, श्री पिताम्बरा चण्डी” यागाचे आयोजन करण्यात आले होते, हजारो सेवा केंद्राच्या माध्यमातून लाखो सेवेकरी व  देशवासियांनी या राष्ट्रकल्याण सेवेत सहभाग होऊन भारत मातेच्या चरणी सेवा रुजू केली.

या २१ दिवसांच्या कालावधीत सर्व सेवाकेंद्रांत रोज श्री दुर्गा सप्तशतीच्या १ ते १३ अध्यायांच्या प्रत्येक ओवीनंतर श्री बगलामुखी मंत्र लावून पाठ करण्यात आला होता. त्यानंतर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री पितांबरा चंडी यागाचे  आयोजन करण्यात आले होते.