युवा प्रबोधन विभागांतर्गत शिवतीर्थ रायगड येथे ऐतिहासिक “शिव प्रेरणा युवा महोत्सव” संपन्न

युवा प्रबोधन विभागांतर्गत शिव प्रेरणा युवा महोत्सव शिवतीर्थ रायगड येथे रविवार दिनांक १०-मार्च-२०१९ रोजी रायगड भूमीवर ऐतिहासिक शिव प्रेरणा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातुन आणि परराज्यातून एकूण साधारणतः हजारो युवक -युवती, बालसंस्कार प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी, सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास तज्ञ श्री पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला तर राष्ट्रीय नेमबाज हिमांशू परदेशी यांनी स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्यामुळेच आज यशाच्या शिखरावर असल्याचे सांगून युवा वर्गाला सेवा मार्गात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता शिव प्रतिज्ञा व राष्ट्रगीताने करण्यात आली.

या रायगड महोत्सवात गुरुपुत्र आदरणीय श्री नितिन भाऊ मोरे यांचे Video Conference द्वारे युवा वर्गास अनमोल मार्गदर्शन झाले.

गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांचे हितगुज:

* युवा सेवेकऱ्यांना आपला दैदिप्यमान इतिहासाची माहिती व्हावी यासाठीच रायगड युवा महोत्सव नियोजन !

* शिवरायांनी जसे किल्ले निर्मिले तसे ब्र.भू.प.पु.मोरेदादा यांनी लोककल्याणासाठी सेवा केंद्राची निर्मिती केली.

* आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे, राष्ट्रप्रेम, राष्ट्रकल्याणाच्या विचारांच्या निर्मितीसाठीच या रायगड युवा महोत्सवाचे नियोजन आहे.

* छत्रपती शिवरायांनी जसा एक एक मावळा घडविला तसे ब्र.भू.प.पु.मोरेदादांनी,परमपूज्य गुरुमाऊलींनी एक एक सेवेकरी घडविला.

* छत्रपती शिवरायांनी साहसी मावळे निवडण्यासाठी होळी सारख्या सणांचा उपयोग केला होता.

* युवा वर्गास छत्रपतींचे व्यवस्थापन समजून सांगण्यासाठीच रायगड मेळावा आयोजित केलेला आहे.

* आत्ताचा Surgical Strike म्हणजेच छत्रपती शिवरायांचा गनिमीकावा !

* छत्रपती शिवरायांनी १८ पगडजातींची समाजबांधणी केली त्याप्रमाणे ब्र.भू.प.पु.मोरेदादांनी माणुसकी हा एकच धर्म हे ब्रीदवाक्य घेऊन स्वामी कार्याची निर्मिती केली.

* चांगली पिढी निर्माण करावयाची असेल तर छत्रपतींचे तंत्र आणि नीती शिकविणे आवश्यक आहे.

* राजमाता जिजाऊंनी केलेल्या गर्भसंस्काराच्या परिणामाने छत्रपती शिवरायांनी भव्यदिव्य इतिहास निर्माण केला.

* शिवराय बाल्यावस्थेत असतानाच त्यांना राजमाता जिजाऊंनी शास्त्र प्रशिक्षण आणि शस्त्र प्रशिक्षण देऊ केले होते.

* सर्व गोष्टींचे ज्ञान शिवरायांनी आत्मसात केल्याने त्यांनी प्रत्येक संकटावर मात केली.

* आपल्या राष्ट्रास बाह्यशक्तीपेक्षा अंतर्गत शक्तींचा जास्त धोका आहे.

* छत्रपती शिवरायांना आई भगवतीचा आशीर्वाद होता.

* समस्या,प्रश्न,अडचणींनी ग्रासलेल्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविणे ही आपल्या सेवेकऱ्यांची जबाबदारी आहे.

* युवा प्रबोधनाच्या कार्यासाठी युवकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

* भविष्यात वेगवेगळ्या धारातीर्थ गड-किल्यांवरती जाऊन दुर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षण व स्थापित देवतांचा मान-सन्मान करून त्यांना आदरांजली वाहणार आहोत.

सबसे बडा गुरू,गुरु से बडा गुरू का ध्यास

संस्कार – संस्कृती – चारित्र्य निर्माण – राष्ट्र निर्माण!