श्री स्वामी समर्थ महाराज जयंती (दिं.प्र.उ.) (चैत्र शु. २ (दि. ७ एप्रिल २०१९)

भगवान “श्री स्वामी समर्थ” यांचा प्रगट दिन किंवा जयंती. या दिवशी प्रत्येक दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात पुढील प्रमाणे मांदियाळी साजरी करावयाची असते.

वेळ –  प्रत्येक चैत्र शुद्ध द्वितीयेस सकाळी ८ ते सायंकाळी ७

उद्देश

१. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र यात चालणार्‍या सर्व सेवा व महत्त्वाचे सर्व विषय एका दिवसात प्रात्यक्षिक रुपाने उजळणी करणे.

२. सेवेकर्‍यांनी स्वत: सेवा करून इतरांनाही सेवा करावयास लावणे व स्वामी भक्तिची आवड

निर्माण करणे.

३. नवीन सेवेकर्‍यांना सर्व सेवांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करणे.

* कार्यक्रम *

* स.८.00 ते ८.१५ भूपाळी आरती, प्रसाद

* स. ८.१५ ते १० श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन, हवन व अभिषेक, ११ माळी ‘श्री स्वामी समर्थ’ षडाक्षरी मंत्राचे हवन आणि अभिषेक.

* स.१०.३० ते ११ – डब्यातील एकत्र केलेले पाच नैवेद्य व गोपाळ काला, आरती.

* स. ११ ते १२ -विविध स्तोत्र व मंत्र यांचे सामुदायिक वाचन.

* दु.१ ते ३ -नाडीवरील मंत्र, तोडगे, उतारे प्रात्यक्षिक.

* दु.३ ते ५ -पंचांग पहाणे, वर्षभरातील सण, वार, व्रत वैकल्यांचे प्रात्यक्षिक.

* सायं ५  ते ६ सांस्कृतिक कार्यक्रम, गवळणी, भारुडे, फुगड्या, वासुदेव, पांगुळ, वाघ्या इ.

* सायं. ६ ते ६.३० जप, वाचन, मनन, चिंतन, ध्यान.

* सायं.६.३० वाजता-दिवसभरातील विविध माध्यमातून  महाराजांची केलेली सेवा त्यांना समर्पित करणे, आरती व प्रसाद. भगवान दत्तात्रेयांचा विश्व-कल्याणाचा हा जो स्वामींचा अवतार आहे तो त्यांच्या युगायुगींच्या अनेक अनुभूतीतून साकार झालेला आहे व आजही महाराज आपल्यातच असून आपण फक्त आपल्या बुद्धिप्रमाणे सेवामार्गातून ही सेवा करावयाची आहे.