परमपूज्य गुरूमाऊलींच्या उपस्थितीत दुष्काळनिवारणार्थ, सुपर्जन्यवृष्टी व राष्ट्रकल्याणासाठी भव्य एकदिवसीय “श्री गुरुचरित्र पारायण” श्री गाणगापूर(कर्नाटक) येथे संपन्न

🚩 श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) व
🚩अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर्फे दुष्काळनिवारणार्थ, सुपर्जन्यवृष्टी, भारत मातेचे संरक्षण, उत्तोरोत्तर प्रगती, शत्रू राष्ट्रांपासून संरक्षणसाठी परमपूज्य गुरूमाऊलींच्या आदेशाने श्री गुरूचरित्राची अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक, शाखा: संगम रोड “गाणगापूर” येथे शुक्रवार दि २४ मे २०१९ रोजी विक्रमी संख्येत एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण झाले. “९०००” पेक्षा जास्त “श्री गुरुचरित्र पारायण” करण्यात आले.

सर्व सेवेकरी-भाविकांनी परमपूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत राष्ट्रसेवेत सहभागी झाले.

यावेळी विविध नवीन प्रकाशने करण्यात आली यामध्ये “विवाह संस्कार प्रतिनिधींसाठी” विशेष नव्या स्वरूपातील विवाह संस्कार “android app” चे लोकार्पण करण्यात आले.