विश्वविक्रमी कागदी आकाश कंदिल बनविणे – नागपुर (अधिक माहितीसाठी क्लिक करा.)

नागपुर येथे दीपावलीत हजारो आकाश कंदीलद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश !

सामुहिकरीत्या प्रदुषण्मुक्त व फटाकेमुक्त दिपावली संदेश देणारे

विश्वविक्रमी कागदी आकाश कंदील बनविणे

दिनांक ः १ ऑक्टोबर २०१९ , वेळ ः सकाळी ः ११ वाजता, स्थळ ः नागपुर मधिल विविध शाळा व केंद्र

      अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागा अंतर्गत दिनांक १ – १० – २०१९  रोजी नागपूर येथे हजारोंच्या संख्येत कागदी आकाश कंदील बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम या सेवाकार्याचे प्रमुख मार्गदर्शक परमपूज्य गुरूमाऊली व बालसंस्कार तथा युवा प्रबोधन विभागाचे मार्गदर्शक आदरणीय श्री नितीनभाऊंच्या मार्गदर्शनाने राबविला जाणार आहे.

           या उपक्रमात नागपूरमधील श्री स्वामी सेवा केंद्रातील आणि काही शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून हे विद्यार्थी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आकाश कंदील तयार करण्यासाठी एकत्रित येणार आहेत.

           दिपावली सण देशात सर्वच ठिकाणी उत्साहात साजरा होत असतो. या निमित्त घरोघरी आकाश कंदील व फटाके यांची खरेदी केली जाते. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करताना विभागाने या वर्षी प्लास्टिकमुक्त आकाश कंदील वापरण्याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने  कागदी आकाश कंदील तयार करून त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश देण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेले हे कागदी आकाश कंदील पर्यावरणास कोणत्याही दृष्टीने नुकसानकारक ठरत नसल्याने प्लास्टिकमुक्त भारत या संकल्पनेत हा महत्वाचा हातभार लागणार आहे.

            विद्यार्थी हे स्वतः तयार केलेले हजारो आकाशकंदील त्यांच्या घरी लावणार असल्याने यातून त्यांना स्वनिर्मितीचा आनंद व पर्यावरण रक्षणाचा संदेश असे दोन्ही हेतू साध्य होतील असे नमूद करताना जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या नियोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.