५. कृषीशास्त्र विभाग

 

श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील कृषीशास्त्र विभाग असून कृषक बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना सुखी, समृद्ध व स्वावलंबी करण्यासाठी पारंपारिक शेतीला अध्यात्म व विज्ञान यांची योग्य सांगड घालून सहज सोप्या पद्धतीत प्रशिक्षणातुन प्रशिक्षित केले जाते. शेतेतील विविध समस्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच मनोबल वाढीसाठी राष्ट्रीय कृषी सत्संग मेळाव्याद्वारे प्रभोधन केले जाते. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलातील दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय/नैसर्गिक शेतीद्वारे जैव विविधतेची जोपासना करणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी देशी गावरान बियाणे संवर्धन व प्रचार – प्रसार , देशी गौवंश संगोपन, घरगुती खते औषधे निर्मिती, खेडयांकाडून शहराकडे होणारे स्थानांतर टाळण्यासाठी ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण व गटशेतीद्वारे कृषिपूरक जोडव्यवसाय व प्रक्रिया निर्मिती, करून बाजारपेठ उपलब्ध करणे, भौगालिक स्थितीला अनुकूल स्थानिक पीक पद्धतीनुसार जिल्हानिहाय दिंडोरी प्रणीत आदर्श शेती मॉडेल तयारकरण्याचे महत्वपूर्ण कार्य या विभागातून केले जाते.

संपर्क: (०२५५७) २२१७१०, ७७५७००८६५२

अधिक माहितीसाठी :krushi.dindoripranit.org

कृषीशास्त्रपशुगौवंश विभाग मार्गदर्शन चर्चासत्र व प्रशिक्षण शिबीर, मासिक सत्संग, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर(नाशिक)

(आदरणीय श्री. आबासाहेब मोरे)

* प.पू.गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने कृषीशास्त्र विभाग आज प्रगतीपथावर जात असून या विभागाच्या माध्यमातून असंख्य शेतकरी जोडले जात आहे.

* आज आपण तणनाशकाचा वापर करतो तो एक अविभाज्य भाग बनला असून, या तणनाशकामुळे जमिनीची उत्पादकता कमी तर होणार नाही ना? याचे भान शेतकर्‍याने ठेवायला हवे.

* रानभाज्या व तनभाज्यांची माहिती ग्रामीण भागात, वनात राहणार्‍या महीलांना असते त्यामुळे त्या महिला पारंपरीक आणि औषधी वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणुन सर्रास वापर करतात.

* बोंडअळी नियंत्रीत करण्यासाठी ट्रॅपचा वापर करावा.

* कृषीशास्त्र विभाग म्हणजेच शेतीचेशास्त्र, यामध्ये विविध कामे करता येतात, यात श्रमसाफल्य, आपल्यातील कौशल्य यांची जडण-घडण होते.

* सूर्य अग्नीतत्वाचे प्रतिक असल्यामुळे वनस्पती फांद्या व पानांतून, तर चंद्र जलतत्वाचा प्रतिक असल्याने झाडांच्या मुळांमधून अन्न तयार करतात.

* सर्व शेतकरी बांधवांनी पंचांग अभ्यासले पाहीजे;  त्यातील संवत्सर फलामध्ये संपुर्णपणे शेतीचा वार्षिक अहवाल असतो. पावसासंबंधीच्या अनुमानात हवामान खात्यापेक्षा ज्योतीषशास्त्राचा प्रभाव अधिक दिसून येतो.

* खतांऐवजी निसर्गातील विविध घटकांचा योग्य वापर करून देखील शेती करता येते.

* शेती व शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी शाकंभरी सिड बँक महत्वाची ठरेल.

दिं.प्र. कृषीशास्त्र व पशु-गौवंश विभाग: DD Kisan Documentary film Part 1

दिं.प्र. कृषीशास्त्र व पशु-गौवंश विभाग: DD Kisan Documentary film Part 2