अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे यांना “क्रांतीदूत” पुरस्काराने सन्मानित (सन्मान सोहळा व अधिक माहिती….)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे आदरणीय श्री. चंद्रकांतदादा  मोरे यांना नुकताच महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे “क्रांतीदूत” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदरणीय दादांना हा पुरस्कार अध्यात्मिक, सामाजिक कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिला जातोय. तसे पहिले तर आदरणीय दादांचे या क्षेत्रातील कार्य खूप महान आहे, थोडक्यात सांगणे शक्य नसले तरीही दादांच्या कार्याचा आढावा घेणारा हा एक अल्पसा प्रयत्न…!
 
आदरणीय चंद्रकांत दादा यांचा थोडक्यात परिचय म्हणजे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे ऊर्ध्वयू गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांचे थोरले सुपुत्र…! 
आदरणीय चंद्रकांत दादांना या कार्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला असून दादांच्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती स्वतः:ला याच कार्यामध्ये झोकून कार्य करीत असल्याने हे सामाजिक व अध्यात्मिक कार्य अविरत पणे सुरु आहे…. हा प्रवास सुरु झाला तो ६ दशकांपूर्वीच म्हणजेच सद्गुरू प.पू. मोरेदादांच्या काळात. सद्गुरू मोरे दादा म्हणजेच चंद्रकांत दादांचे आजोबा आणि गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांचे वडील. 
मूळचे शेतकरी असलेल्या सद्गुरू मोरेदादांनी तत्कालीन काळात अंधश्रद्धेने ग्रासलेल्या सर्वसामान्य लोकांना व शेतकऱ्यांना सहज सोप्या पद्धतीने अध्यात्म समजावून सांगण्याचे कार्य सद्गुरू दादांनी आपल्या शेतातूनच  सुरु केले होते. कालांतराने या कार्यातुन गावोगावी सेवाकेंद्रांची निर्मिती झाली. सेवाकेंद्रातून स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या दिन:दुःखितांना विविध विषयांवरील मार्गदर्शनातून ज्ञानदानाचे कार्य होऊ लागले. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची, त्यातून निर्माण होणाऱ्या जोड व्यवसाय, पशु व गोपालन यांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती मिळू लागली. 
सद्गुरू मोरेदादांच्या  महानिर्वाणा नंतर गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांनी या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि सेवामार्गातुन “ग्राम अभियानाचे” कार्य सुरु केले. ग्रामअभियान म्हणजे गावोगावी जाऊन तिथल्या सामाजिक, कौटुंबिक समस्या जाणून घेणे व त्यावर आध्यत्मच्या मार्गाने सोपे उपाय सुचविणे. उदा. गावातील अस्वच्छतेचा प्रश्न सोडविताना लोकांना पटवून द्यावे की “हात फिरे । तेथे लक्ष्मी वसे।। “ आणि मग लोकसभागातून गावांची स्वछता मोहीम राबविणे, आरोग्याच्या समस्यांसाठी “धन्वंतरी देवतेचे व आयुर्वेदाचे” महत्व पटवून देऊन आरोग्य शिबीर घेणे, स्वयंरोजगार मेळावे, विवाह विषयक प्रबोधनातून अन्नाचा व पैशांचा अपव्यय कमी करण्यासाठी साखरपुड्यातून विवाह किंवा  सामुदायिक विवाह सोहळे, गावातील भग्न झालेली मंदिरांची पुनर्स्थापना करणे, नदी स्वच्छतेतून नदीचा मानसन्मान करणे, कृषी मेळावे घेणे अशा विविध सामाजिक विषयांवर प्रात्यक्षिकरित्या मार्गदर्शन करण्याचे कार्य या ग्रामअभियानातून होऊ लागले… 
आज सेवामार्गाच्या ग्राम ग्रामाभियानातील १६ विभागांच्या माध्यमातून हे कार्य सूत्रबद्धरित्या सुरु आहे.
 
१) बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग
२) प्रश्नोत्तरे विभाग
३) विवाह संस्कार विभाग
४) आरोग्य व आयुर्वेद विभाग
५) कृषीशास्त्र विभाग
६) भारतीय संस्कृती व अस्मिता विभाग
७) कायदेशीर सल्लागार विभाग
८) वास्तुशास्त्र विभाग
९) याज्ञिकी विभाग
१०) स्वयंरोजगार विभाग
११) प्रशिक्षण विभाग
१२) पर्यावरण प्रकृती विभाग
१३) पशु-गौवंश विभाग
१४) माहिती व तंत्रज्ञान विभाग
१५) प्रशासकीय विभाग
१६) देश विदेश अभियान विभाग

क्रांतीदूत पुरस्कार वितरण सोहळ्यातील काही क्षणचित्रे  ..
                                            
   पुरस्कारातील सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्र                   
                         
 
सेवामार्गाच्या आजवर संपूर्ण जगभरात शाखा आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये ५००० पेक्षाही अधिक तर महाराष्ट्राबाहेर व सुमारे २००० पेक्षाही जास्त शाखा असून तब्ब्ल ७ ते ८ देशांमध्येही सेवामार्गाचे कार्य सुरु आहे. 
संपूर्ण केंद्रांचे नियोजन प्रशासकीय दृष्ट्या चोख असावे यासाठी आदरणीय चंद्रकांत दादा स्वतः दक्ष असतात… 
आदरणीय श्री. चंद्रकांत दादासाहेब यांना या पुरस्कारासाठी अभिनंदन व त्रिवार वंदन…..श्री स्वामी समर्थ…!