प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (जुलै २०१८)

* विनाहुंडा, विनामानपान तसेच रुसवे फुगवे इत्यादींना दूर सारत विवाह संस्कार सोहळा संपन्न करावा. हीच शिकवण विवाह मंडळ हा विभाग समाजाला देत आहे, विवाह मंडळ ही संकल्पना केंद्रा-केंद्रात प्रस्थापित होण्यासाठी ज्येष्ठ प्रतिनिधींनी, मध्यमवयीन स्त्री-पुरुष सेवेकर्‍यांनी हातभार लावावा.

* आगामी पेरणीच्या हंगामात शेतकर्‍यांनी बियाणे आणून दुसर्‍याच दिवशी पेरणी करणे टाळावे. त्याऐवजी नियोजित पेरणीच्या मुहूर्तावर पेरणी करावी तसेच पेरणी करण्याच्या साधारण ७-८ दिवस आधी बियाणे आणून त्यावर आध्यात्मिक सेवेचे संस्कार करावेत. बियाण्यांवर ‘श्री स्वामी समर्थ’ तसेच गायत्री मंत्राचा जप करावा, यामुळे अनेक पट चवदार उत्पन्न वाढते.

*मोबाईलचा अती वापर, महिलांनी तंग कपडे घालणे तसेच टि.व्ही. चा अतिरेक या गोष्टी असाध्य आजारांना निमंत्रण देतात.

*पायाचे हाड अथवा टाचेचे हाड वाढले असल्यास देशी गाईच्या तुपात वेखंड उगाळून, ते मिश्रण गरम करून कोमट स्वरूपात लावावे.

* सेवा कार्यातले विचार जनतेपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असून ही गरज सेवेकरीरुपी पोस्टमन पूर्ण करतील.

* मनोवांछित संतती, गर्भसंस्कार व पालकत्व या विषयावर ज्ञानात्मक मार्गदर्शन होण्याची आज विश्‍वाला गरज आहे.

अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक जुलै २०१८. संपर्क(०२५५७)२२१७१०