श्रीराम नवमी- चैत्र शु.८/९ (दि. १३ एप्रिल २०१९)

वर्ष प्रतिपदेला बसलेले देवी नवरात्र व राम नवरात्र नवमीस समाप्त होते. राम नवमीचा जन्मोत्सव दुपारी होतो. सर्व सेवा केंद्रांनीया दिवशी ठीक १२.३९ वाजता आपल्या केंद्रात रामजन्मोत्सव साजरा करावा व ठीक या वेळेला घरी किंवा केंद्रात रामरक्षा एकदा म्हणावी. रामनवरात्राचे निमित्ताने केंद्रात सामुदायिकपणे सायंकाळी आरतीनंतर रामरक्षा, मारुतीस्तोत्र वाचावे.

दमणार्पण व्रत (दवणा वाहणे)

चैत्र शुक्ल पक्षात दमणार्पण व्रत असते.पंचांगात त्या त्या तिथीला त्या त्या देवास दवणार्पणकरण्याविषयी उल्लेख असतो. दवण ही एकसुवासिक, औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये यावनस्पतीस दमन असे म्हणतात.

नावाप्रमाणेच ही वनस्पती मानवातील अतिरेकी विकारांचे दमन करते. विशेषत: कामक्रोधादिंचे दमन करणे. हे मानवाच्या पुरुषार्थ प्राप्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. दवणा आणून त्याची पंचोपचार पूजा करावी व नंतर देवास वहावा. चैत्र शुद्ध द्वितीयेस शंकर पार्वतीस, नवमीस देवीस, द्वादशीस विष्णूस व श्री स्वामी महाराजांना, त्रयोदशीस महादेवास व पौर्णिेस सर्व देवांना ‘दवणा’ वाहण्याची प्रथा आहे.