रंगपंचमी (फाल्गुन कृ.५) (दि. ६ मार्च २०१८)

होळीचा ५ वा दिवस. या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपले शरीर सात धातूचे व सात रंगांचे बनले आहे, म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटते. आपल्या शरीराला विविध रंगांची आवश्यकता असते त्या रंगांची कमतरता असल्याने आपण अनेक उपाय करतो. त्या ऐवजी सर्व रंगांचे मिश्रण होळीत रंग

खेळण्याने होते. पण रंग कोणते तर साग, पळस, शिंगाड्याच्या पिठापासून बनविलेला गुलाल, अबिर, चंदन अशा वस्तु सांगितल्या. पळस वृक्ष तर अत्यंत

गुणकारी आहे. पळसाच्या समिधा यज्ञात मुद्दाम जाळतात कारण ती कठोरता, कठीणता याची कसोटी आहे. म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक, साल, फळ,

फुल, पान यांचा विविध औषधांत वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहीले तर ते रंग शरीर रंध्रातून शोषण होऊन शरीरात स्नायुंना मिळतात व येणार्‍या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करतांना होणार्‍या रोगांना प्रतिबंध होतो.

 पण आज होलिकोत्सवाचे स्वरुप अत्यंत बिभत्स आहे. चोर्‍या करणे, आगी लावणे, शेण मातीचा मारा करणे, चांगल्या रंगांऐवजी आरोग्याला घातक अशी रसायने मिश्रीत रंग वापरणे या सर्वाुंळे या शास्त्रोक्त पद्धतीवर असलेल्या सणाचा विपरीत परिणाम होतो. ऋतुसंधी काळात उत्पन्न होणार्‍या सर्दी, पडसे, गोवर, कांजण्या, त्वचारोग यावर उपाय न होता अपाय होतात.

 या सणाविषयीची एक कथा अशी-

फाल्गुन वद्य पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्रीपुरुषांना एकत्र करून, रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता. जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे. तेआत्मविश्वास हीन नसावे, ते सप्तरंगांने, संगीताने व परस्पर प्रेसंबंधांने खुलले पाहिजे. हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगांचे आरोग्य दृष्ट्या, योगशास्त्र दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ जाणून घेतले पाहिजे व त्यानुसार उपयोग केला पाहिजे.

खालील रंग आपणास काय सुचवितात हे पाहू:

लाल रंग – शक्ती, स्फूर्ती

पिवळा रंग – ऐश्वर्य, प्रसन्नता

नारिंगी रंग – भक्ती

हिरवा रंग – प्रभावशाली, समृद्धी

निळा रंग – शांती, आकाशाचे प्रतिक आहे.

आकाश हे शब्दांचे प्रतीक आहेत. शब्दाचे रुपांतर गाण्यात झाल्यास झोप येते, योगशास्त्र सांगते पिवळा रंग मुलाधारचक्र, नारिंगी मणिपूर चक्र, लाल

रंग अनाहत चक्र, जांभळा रंग आज्ञाचक्र, हिरवा रंग सहस्त्रचक्र जागृत होण्यास मदत होते. म्हणून प्रत्येक कार्यात रंग संगती सांगितली जाते. लाल रंग स्फुर्ती देतो, हिरवा रंग तजेला देतो, थकवा दूर करतो, निळा रंग शांती प्रदान करतो.

असे रंगांचे प्रभाव असल्यामुळे रंग खेळण्याची गंत म्हणून नव्हे तर प्रत्येक पूजेतसुद्धा आसन, परिधानाचे कपडे कसे असावे हे देखील सांगितलेले आहे.