जागतिक कृषी महोत्सव २०१८ मध्ये सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी संपन्न अधिक माहितीसाठी क्लिक करा..

सरपंच व ग्रामसेवक मांदियाळी संपन्न

शेतीच्या विकासासोबतच गावचा विकास कसा साधावा? यासाठी कृषीमहोत्सवा दरम्यान दरवर्षी “सरपंच मांदियाळी” चे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवेकऱ्यांनी जोडलेल्या काही निवडक गावातील सुमारे २००० सरपंचांचा आत्तापर्यंत सहभाग नोंदविण्यात आला आहे.

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत हाच शासकीय यंत्रणेचा पाया आहे. ग्रामअभियान संकल्पना जनते पर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक हे स्थानिक पातळीवरील महत्वाचे घटक असल्याने सरपंचाना गाव विकासाची दिशा मिळण्याचे दृष्टीने कृषी महोत्सवात “सरपंच / ग्रामसेवक मांदियाळी” घेण्यात येते.

सरपंच ग्रामसेवक मांदियाळी साठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा.ना.श्री.पाशा पटेल (अध्यक्ष: महाराष्ट्र कृषीमूल्य आयोग),  मा.श्री. राजु शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), मा.ना.श्री. बबनराव लोणीकर (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य),  मा.श्री. पोपटराव पवार(हिवरे बाजारचे आदर्श माजी सरपंच), मा.श्री.पुरुषोत्तम घोगरे पाटील (अध्यक्ष: सरपंच संघटना), मा.श्री. ढाकणे साहेब (अध्यक्ष: ग्रामसेवक संघटना, महा.राज्य) , मा.श्री.बाळासाहेब म्हस्के (उपाअध्यक्ष: सरपंच संघटना), मा.श्री.पाहुचे पाटील (सरचिटणीस: सरपंच संघटना), मा.श्री. वाघचौरे साहेब (अध्यक्ष: सरपंच संघटना, नाशिक जिल्हा) आदींची उपस्थिती लाभली होती.

सरपंच / ग्रामसेवक मांदियाळीचे उदिष्टये…

 • गावाच्या विकासाला वेग यावा म्हणून मान्यवर तज्ञाचे मार्गदर्शन.
 • आदर्श गाव बनविणाऱ्या सरपंच/ग्रामसेवकांचा सन्मान.
 • सर्व धर्म समभाव असणाऱ्या गावाचा सन्मान.
 • शासन, प्रशासकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना एकत्रित करणारे व्यासपीठ.
 • राष्ट्रप्रेमी व सुदृढ पिढी निर्माण होण्यासाठी बालसंस्कार व युवा प्रबोधन व्हावे.
 • युवकांच्या रोजगार निर्मितीची सोय झाल्यास गाव स्वावलंबी होण्यास मदत होईल.
 • सामुदायिक विवाह किंवा साध्या विवाह पद्धती ज्यात मानपान, हुंडा, कर्कश्य वाद्य या गोष्टीना हद्दपार करणे, जेणे करून गावातील नागरिक कर्जबाजारीपणापासून दूर राहील.
 • वृक्षरोपणातून पर्यावरण रक्षणाचे कार्य व्हावे.
 • ग्राम स्वच्छते सोबतच पाणवठा व नदी शुद्धीकरणाचा विचार व्हावा.
 • गावात गोशाळा, सामुहिक धान्य कोठार, दुग्ध व्यवसायासारखे शेती पूरक जोड व्यवसायांना चालना मिळावी.
 • स्वावलंबी शेतीसाठी शेतीतून सात्विक अन्न,धान्य, भाजीपाला, फळेउत्पादनाकडे कल वाढवावा. यारीतीने गावाचे आरोग्य आबाधीत राहील.
 • ग्रामदैवतांचा दरमहा मानसन्मान.

कृषी महोत्सव ‘सरपंच / ग्रामसेवक मांदियाळीत’ मान्यवरांचे मार्गदर्शनाने प्रायोगिक तत्वावर

काही गावे ग्रामाभियान अंतर्गत सक्षम करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने..?

 • गावाच्या विकासासाठी सरकारी योजनांचे प्रबोधन करणे.
 • कृषी महोत्सवात सामील झालेल्या काही मान्यवर समाजसेवी कंपन्याकडून गावासाठी C.S.R. योजनेचे मदत मिळविणे.
 • गावपातळीवर धार्मिक स्थळी स्वच्छता व देखभाल करणे (वेद विज्ञान संशोधन विभाग)
 • दरमहा शेतकरी व युवकांसाठी प्रबोधन वर्ग घेणे.
 • अल्प खर्चात शाश्वत शेती उत्पादन कसे घ्यावे याचे मार्गदर्शन करणे.(कृषी शास्त्र विभागाच्या साह्याने)
 • शेती जोड व्यवसायाचे मार्गदर्शन.
 • गावातील युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करणे.(स्वयंरोजगार विभाग)

मा. श्री. पोपटराव पवार(ग्रामविकास तज्ञ मार्गदर्शक, हिवरे बाजार)

मार्गदर्शन

* गावाचा कारभार आदर्शवत करायचा असेल तर सरपंचांनी स्वत: अभ्यासू व्हावे.

* विविध ग्रामविकास योजनांचा पाठपुरावा करून गावाचा विकास करण्याची खरी गरज आहे.

* केवळ शासनावर अवलंबून न राहता सरपंच व ग्रामपालिकेनेदेखील पुढे येण्याची गरज आहे.

यावेळी आदर्श सरपंच व ग्रामसेवक महिला व पुरुष यांना प.पू.गुरुमाऊली यांच्या हस्ते कृषी माऊलीपुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये

 • मा.श्री बाळासाहेब कारभारी बोराडे  (आदर्श ग्रामसेवक) मु.पो.सायगाव, ता.येवला, जि.नाशिक
 • मा.सौ. सविता अजय पोटे (आदर्श सरपंच) मु.पो.सिन्नर, नाशिक
 • मा.श्री. राजेंद्र वसंतराव बोरगुडे (आदर्श सरपंच) मु.पो.नैताळे, ता.निफाड, जि.नाशिक

http://krushimahotsav.org/2018/seminar-mar.html