७ व्या जागतिक कृषी महोत्सव: संपन्न झालेल्या विविध चर्चासत्र कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहितीसाठी

दि. २५ एप्रिल
सकाळी ८.०० ते १०.००

कृषी दिंडी

(रामकुंड ते डोंगरे वस्तीगृह मैदान, नाशिक )

हजारो शेतकरी सेवेकरी भाविकांच्या आनंदमयी, उत्साहाच्या वातावरणात कृषी दिंडी संपन्न झाली. यामध्ये राज्यातील व स्थानिक बालसंस्कार केंद्रातील बालगोपालांनी बेटी बचाव..!, झाडे लावा, झाडे जगवा..!, पर्यावरण प्रकृती बद्दल विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला. सदर कृषी दिंडीच्या या सोहळ्यात स्थानिक नागरिकांनीहि हजेरी लावली.

 
सकाळी १०.०० ते दुपारी १.००

उद्घाटन सोहळा

डोंगरे वस्तीगृह मैदान, नाशिक )

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या जागतिक कृषी महोत्सवाची सुरुवात शेती उपयोगी अवजारे पूजन, धान्यपूजन, मातीपुजन व प्रातिनिधिक स्वरुपात शेतकऱ्याच्या मानसन्मानाने करण्यात आले.

दुपारी: २.०० ते ५:००

नैसर्गिक शेतीतून शाश्वत समृद्धी

सहभागी तज्ञ:

मा. श्री. ताराचंद बेलजी

(नैसर्गिक शेती तज्ञ)

प्राकृतिक खेती शोध संस्थान, नृसिंहपूर, मध्यप्रदेश

मार्गदर्शन

* मानवी आहार आणि शेतातल्या पिकांसाठी षडरस यांची आवश्यकता

* नैसर्गिक शेती सर्वोत्तम शेती त्यात आध्यात्मिक बाबींचा समावेश

* पिकांसाठी आवश्यक सेंद्रिय व प्राकृतिक रसायनांची माहिती : भस्म रसायन, संजीवनी रसायन, बिल्व रसायन, गाजर घास ई.

मा.श्री.प्रशांत नाईकवाडी

(वरिष्ठ सेंद्रिय शेती प्रमाणिकरण अधिकारी, नोका, पुणे. )

मार्गदर्शन

* सेंद्रिय शेतीमध्ये आवश्यक असलेल्या महत्वाच्या तीन बाबींबद्दल माहिती: पाणी, सूर्यप्रकाश, माती

* सेंद्रिय शेती प्रमाणिकरण

* प्रकाश संश्लेषणसाठी आवश्यक सूर्यप्रकाश

सायं : ६.०० ते ७:००

कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधन कार्यक्रम

२६ एप्रिल
दुपारी: २.०० ते ५:००

देशी बी-बियाणे: काळाची गरज

सहभागी तज्ञ:

मा. श्री. सतीश पुंजा कानवडे

( देशी बियाणे संवर्धन व प्रचार प्रसार )

मार्गदर्शन

* देशी वाणांची “सिड बँक” बद्दल माहिती

* देशी व परदेशी फळांच्या १०५ प्रकारच्या जातींची ७०० झाडांची थोडक्यात माहिती

* कृषी पर्यटनाला आयुर्वेदाची जोड कशी देता येईल.

मा. श्री. वसंत फुटाणे

नैसर्गिक शेतकरी, अमरावती

मार्गदर्शन

* देशी बियाणे जतन कसे करावे.

* देशी बियाणे संवर्धन काळाची गरज.

संध्या: ६.०० ते ७.००

कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधन कार्यक्रम

२७ एप्रिल
सकाळी: १०.०० ते १:००

पर्यावरण जनजागृती व दुर्ग संवर्धन

मा.प्रो.श्री. अशोकजी तेजनकर

प्रो-व्हाईस चान्सलर ऑफ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटी औरंगाबाद

मार्गदर्शन

* भूगर्भातील खडकांचे विविध प्रकार.

* पाण्याची पातळी कशी वाढविल्या जाऊ शकते उपाय.

मा.श्री. पांडुरंग बलकवडे

जेष्ठ इतिहास तज्ञ, सदस्य: गड संवर्धन समिती, महा.राज्य

मा.श्री. विलास वहाणे

सह संचालक पुरातत्व विभाग, नाशिक

मार्गदर्शन

* दुर्ग संवर्धन कसे करावे

* दुर्ग किल्ल्यांवर जातांना दुर्ग प्रेमींनी घ्यावयाची काळजी

दुपारी: २.०० ते ५:००

दुग्ध व्यवसायातील सोनेरी संधी

सहभागी तज्ञ:

मा.श्री. रमेशजी रुपारेलिया

गीर गौ जतन संस्थान, गुजरात

मार्गदर्शन

* देशी गाईचे महत्व

* देशी गाय व जर्सी गाय फरक

* गायींचे आजार व उपाय

मा.श्री. उत्तम माहेश्वरी

गौ-चिकित्सा एवं गौ विज्ञान प्रचार केंद्र

मार्गदर्शन

* देशी गाईंच्या दुध, तूप, गौमुत्र, शेन, इत्यादींपासून मिळणारे पदार्थ मानवी आरोग्यास फायद्याचे आहे

* पंचगव्यापासून शरीरातील वेगवेगळ्या आजारांवर मात करता येते.

* गौसेवेपासून रोग मुक्ती होऊ शकते.

मा.डॉ.श्री. शैलेश मदने

पशुसंवर्धन सल्लागार

मार्गदर्शन

* मुक्त संचार गोठा पद्धती

* गाईंच्या गोठ्याची निगा व स्वच्छता कशी राखावी

* सुयोग्य चारा व्यवस्थापन

संध्या: ६.०० ते ७.००

कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधन कार्यक्रम

२८ एप्रिल
दुपारी: २.०० ते ५:००

कृषी क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व जोडव्यवसायातील संधी

सहभागी तज्ञ:

मा. श्री. सुनील पोटे

युवा मित्र संस्था, सिन्नर

मार्गदर्शन

* युवा मित्र संस्था कार्य

* कृषी प्रक्रिया उद्योग

मा. श्री. विश्वास कळमकर

विदेशी भाजीपाला उत्पादक

मा. स्वाती शिंपी

एस. फोर. एस. टेक्नोलॉजी सायन्स फॉर सोसायटी मुंबई

मार्गदर्शन

* सोलर ड्रायर

* शेतातील भाजीपाला व फळे : ड्राय करून त्याची मार्केट उपलब्धता

२९ एप्रिल
सकाळी १० ते १:००

युवा महोत्सव

वसुधैव कुटुंबकम् या सुत्रातून सत्य, अहिंसा, परोपकार आणि मानवता या मुलभूत तत्वावर उभारलेली समाजव्यवस्था विश्वात ऐक्यता निर्माण करु शकते. नैतिकतेचे अधिष्ठान असलेली समाजव्यवस्था सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करु शकते. आपल्या राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि शाश्वत ज्ञान दुर्लक्षित करुन केवळ पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने आपण बलशाली राष्ट्र निर्माण करु शकत नाही. तर राष्ट्र निर्माणाच्या या कार्यात संस्कार, संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि सर्वधर्म समभावाची नितांत गरज आहे.

याच पार्श्वभूमीवर दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गेल्या सात दशकांपासून बाल व युवा संस्कार अभियान राबवित आहे. संस्कार, संस्कृती, निती, सदाचार, राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव, व्यसनमुक्ती यांचे बीज युवकांमध्ये पेरत विविध समाजहितपर अभियानातून सुसंस्कारीत युवा पिढी घडविण्याचे महत्कार्य प. पू. गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

प. पू. गुरुमाऊलींनी सन २०१८ हे वर्ष ‘युवा प्रबोधन वर्ष’ म्हणून जाहिर केले आहे. त्यानिमित्ताने गुरुपुत्र श्री. नितिनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. २९ एप्रिल २०१८ रोजी युवकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. राज्यभरातून आलेल्या हजारो युवा सेवेकरी व महाविद्यालयीन युवा वर्गांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

२९

एप्रिल
दुपारी: २.०० ते ४:००

सरपंच मांदियाळी

सहभागी तज्ञ:

मा. श्री. पोपटराव पाटील

तज्ञ मार्गदर्शक, हिवरे बाजार

शेतीच्या विकासासोबतच गावचा विकास कसा साधावा ? यासाठी कृषीमहोत्सवा दरम्यान दरवर्षी “सरपंच मांदियाळी” चे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवेकऱ्यांनी जोडलेल्या काही निवडक गावातील सुमारे २००० सरपंचांचा आत्तापर्यंत सहभाग नोंदविण्यात आला आहे.

 

http://krushimahotsav.org/2018/seminar-mar.html