प्रचंड प्रतिसादात, उदंड उत्साहात युवा महोत्सव संपन्न

आज दि. २९ एप्रिल २०१८, रविवार रोजी युवा प्रबोधन विभागातर्फे भव्य युवा महोत्सवाचे आयोजन संपन्न झाले.

गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या युवा महोत्सवात शिक्षण, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, अध्यात्म, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातील मान्यवर, राज्यातील काना-कोपऱ्यातून आलेले सुमारे दोन हजार युवक – युवती सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे पाणी-पुरवठा मंत्री श्री बबनराव लोणीकर, अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे,विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील लेखक – दिग्दर्शक यांनी या युवा महोत्सवात उपस्थिती नोंदवली.

अतिशय उत्कृष्ट नियोजन, वाखाणण्याजोगी शिस्त, उत्कृष्ट टीमवर्क, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, युवकांना अत्यावश्यक अश्या विविध क्षेत्रातील माहितीची दालनं आणि संबंधित विषयांच्या तज्ञांचे मार्गदर्शन या युवा महोत्सवाचे काही खास वैशिष्ट्ये म्हणता येईल.

आदरणीय श्री नितीन भाऊंनी युवकांना संबोधन करतांना सांगितले कि, युवकांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत जीवन सार्थकी करण्यासाठी मोकळ्या वेळेत सेवामार्गातर्फे आयोजित विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवून राष्ट्रसेवेत सहभागी व्हावे. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी जीवन उपयोगी छोट्या छोट्या गोष्टी कश्या प्रकारे आमलात आणाव्या याचे अमृत सोपान युवकांना दिले.

युवकांना पुढील कार्याची दिशा देतांना आ. श्री नितीन भाऊंनी सांगितले कि, युवा प्रबोधन वर्षाच्या निमित्ताने पुढील महिन्यापासून प्रतिमाह ४थ्या रविवारी श्रीगुरुपीठावर युवा प्रबोधन वर्ग होईल.

सबसे बडा गुरू, गुरू से बडा गुरू का ध्यास!