वटपौर्णिमा (दि. २७ जून २०१८)

कथा व महत्व :

सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरिता यमराजाला भक्ती ने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले.

ज्या वृक्षा खाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. याप्रसंगाची आठवण

म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड आहे. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते.महाराज नेहमी म्हणायचे ‘दत्तनगर, वडाचेझाड, मूळ, मूळ’ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत. वडही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे. गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाज्यावर बांधत असतो. तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेल तयार केले जाते.

पूजेचे साहित्य :-

दोन हिरव्या बांगड्या, शेंदुर, एकगळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचीपाने, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहूइ. वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिेच्या कागदाला (वटपौर्णिेचा कागद बाजारात मिळतो) तिहेरी दोरा बांधावा. सुत कापसाचे काढलेले असावे.

प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद-कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सूत गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी. वटपौर्णिेची आरती म्हणावी. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनास जावे. हळद-कुंकू वाहून, आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा. वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. पाच सुवासिनींची आंबे व गहू इ. ने ओटी भरावी.

ज्येष्ठ महिन्यात पौणिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात. पती व्रता स्त्री कशी असावी याचा ‘सावित्री’ हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घ काळापासून जागृत ठेवली आहे. सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून त्याचे अनेक ग्रंथात वर्णन केले आहे.