देवशयनी एकादशी (आषाढ शु.११) (दि. 23 जुलै 2018)

या दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो. भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर ४ महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी सर्व सेवेकर्‍यांनी उपवास करावा व आपल्याला सद्गुरू प.पू. मोरेदादांनी दिलेला भगवान श्री पांडूरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा. या दिवसापासून ४ महिने गोपद्मव्रत करावे. आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने ३३ गोपद्मे काढावीत. हे व्रत कार्तिक शुध्द एकादशी पर्यंत करावे.

पूजाविधी:

एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटोपून आपल्या कुलदैवतांची व भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, गीतेचा १५ वा अध्याय वा गीतेची १८ नावे पठण करावी, उपवास करावा. उपवास म्हणजे मनाने परमेश्‍वराजवळ निवास करणे. भगवान विष्णूंना एक हजार किंवा १०८ तुळशीपत्र वहावे. पुण्यप्राप्ती बरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी, हा उपवासाचा मूळ हेतू होय. श्री विष्णूंचा चक्र, गदा, कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा मंचकावर निजलेला ङ्गोटो पूजावा. खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे.

‘सुप्ते जगन्नाथे जगत्सुपां भवेदिदम् ।
विबुध्दे त्वयि बुध्देत तत्सर्व सचराचरम॥

भगवान श्री पांडुरंगाचा मंत्र १ माळ जप करणे.

‘श्री वत्सं धारयन्। वक्षे मुक्ता माला षडाक्षरं॥

अधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक पाहावा.