चातुर्मास्य व्रते

* चातुर्मास्य व्रते *

अश्‍वत्थ म्हणजे पिंपळ आणि तुळस यांची पूजा, सेवा, प्रदक्षिणा, दीपदान,
भगवान विष्णूंच्या स्तोत्रांचे, मंत्रांचे पठण, विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, सुलभ
भागवत्, विष्णू पुराण श्रवण, पठण करावे.

* शयनव्रत *

शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित ४ भुजांनी युक्त आणि
लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणाची पूजा, दिवसभर मौन, चंद्रोदयानंतर
अर्घ्य देऊन भोजन करावे. या व्रताने घरावरील संकट टळते व अखंड सौभाग्य
सुख मिळते.