प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (फेब्रुवारी २०१९)

आगामी काळ प्रतिकूल, आगामी युद्धनिती ही बदललेली असेल, भारतवर्षाला ह्या संकटांची झळ पोहोचू नये त्यासाठी आपण अब्जचंडी अंतर्गत पाठात्मक सेवा, एकदिवसीय नवनाथ पारायण अशा सेवांद्वारे आपण ही राष्ट्रसेवा राबवित असतो. नवनारायण आपले रक्षण करत असतात, या देशाला त्यांचे संरक्षण व आशीर्वाद लाभावेत केवळ हाच उद्देश आहे.

कॅन्सरसारखा आजार आयुर्वेदातून दूर व्हावा ही सेवामार्गाची संकल्पना आहे. रासायनिक खतांचे सिंचन केलेल्या भाजीपाल्याने कॅन्सर उद्भवू शकतो.

* प्रत्येकाने एक झाड तरी दत्तक घ्यावं व ते जगवून दाखवावं ह्यालाच ‘वृक्ष लागवड, संवर्धन’ असे म्हणतात.

श्री क्षेत्र पुष्कर येथील मेळावा हा आपल्या ४० पिढ्यांचा उद्धार करणारा ठरेल, आल्या जन्माचे सार्थक पुण्य अशा सेवांमधून मिळत असते. पुन्हा पुन्हा असे क्षण आपल्या आयुष्यात येतीलच असे नाही, या सुखद आध्यात्मिक क्षणांचा आनंद लुटावा.

सेवेकरी करीत असलेल्या कोणत्याही सेवेचा अहंकार नसावा.

* कोणत्याही गावाच्या प्रथमदर्शनी श्री मारुती चे मंदिर असते, गावाची संरक्षण देवता म्हणून ह्या देवतेची ओळख आहे. शक्ती, बुद्धी, ऐक्य ह्याचे प्रतिक म्हणजे मारुती! * समर्थ श्री रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामचंद्रांकडे मागतांना काय मागीतले तर “कोमल कर्णी दे रामा। विमल कर्णी दे रामा । संतसंगती दे रामा। अभेद्य भक्ती दे रामा॥” देवाकडे काय मागावे ह्याचे उत्कृष्ठ असे हे उदाहरण आहे.

* रासायनिक खतांचा वाढता वापर, मोबाईलचा अतिवापर व जर्सी गाईचे दूधाचा वापर इत्यादींमुळे कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते

* जनतेला सुखद धक्का देणारा विभाग अर्थात- ‘विवाहमंडळ’ कारण मुला-मुलींचा विवाह जुळविणे हे आजमितीला अतिशय अवघड कार्य होऊन बसले आहे, तेच कार्य विवाह मंडळ विभाग सहजसोप्या पद्धतीने साकार करीत आहेत. आपल्यामधल्या हजारों हातांची या कार्याला गरज आहे.

अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक फेब्रुवारी २०१९. संपर्क: (०२५५७) २२१७१०