धनत्रयोदशी (आश्‍विन कृ.१३-दि.५ नोव्हेंबर)

या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा ङ्गोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा १ माळ जप करावा.

तुळस वहावी, नैवेद्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासने बरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे. व दीर्घायुष्य व आरोग्य यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या सेवेुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, गीतेचा 15 वा अध्याय, 1 वेळा कालभैरवाष्टक, 1 माळ महामृत्यूंजय मंत्र.

 यमदीपदान : या दिवशी सायंकाळी कणकेचा एक मोठा दिवा किंवा मातीची पणती घ्यावी. त्यात तेल व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला (दिव्याची ज्योत दक्षिणेला करावी) पेटवून ठेवावा व दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यम राजाचा मंत्र म्हणावा व त्याला नमस्कार करावा.

मृत्युनां दण्डपाशाभ्यां कालेन शामया सहा ।

त्रयोदशां दीपदानात् सूर्यज: प्रीयतां मम ॥